दरवर्षी सतत नफ्यात असणारी पतसंस्था म्हणून एकमेव साबळे पतसंस्थेची ओळख – अरुण पवार
प्रतिनिधी - महेश शेलार ( माणगांव )

माणगाव – लोकनेते अशोकदादा साबळे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही स्थापनेपासुनच संपूर्ण रायगड जिल्ह्यात सतत दरवर्षी नफ्यात असणारी एकमेव पतसंस्था म्हणून ओळखली जात आहे याचे संपुरण श्रेय संस्थापक ॲड. राजीव साबळे, संचालक आणि कर्मचारी यांचे आहे असे प्रतिपादन चेअरमन अरुण पवार यांनी २९ सप्टेंबर २०२४ रोजी माणगाव पतसंस्थेच्या २१ व्या वार्षिक सभेत केले.
अर्थिक मंदी, कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, महागाई, सहकार खात्यातील घटना दुरुस्ती, नव्याने आलेले कडक कायदे आणि नियम अशी सर्व आव्हानांचा मुकाबला करीत आलेल्या संकटातही संधी शोधत पतसंस्थेच्या अर्थिक प्रगतीसाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुयोग्य व्यवस्थापन, काटकसर, कडक कर्जवसुली धोरण या त्रिसूत्रीमुळे या पतसंस्थेची कर्ज वसूली प्रमाण सातत्याने दरवर्षी ९५ टक्के राहीले आहे असे अरुण पवार यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पतसंस्थेचे संगणकीकरण करण्यात आले आहे. ग्राहकांना बँकींग सेवा जलद, सहज आणि सुलभ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ऑनलाईन सुविधा, क्यू आर कोड, पिग्मी कलेक्शन मशीन, आर. टी. जी. एस.,जगातील कोणत्याही देशात तात्काळ पैसे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अल्पावधीतच साबळे पतसंस्थेने ग्राहकांचा आणि ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्याने हि पतसंस्था प्रगती पथावर आहे असे व्हाईस चेअरमन प्रशांत साबळे यांनी सांगितले.
या वार्षिक सभेत मुख्य कामकाजासोबतच लोणेरे येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच पतसंस्थेसाठी आणि कार्यालयासाठी नवीन जागा आणि सदनिका खरेदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेत चेअरमन अरुण पवार, व्हाईस चेअरमन प्रशांत साबळे आणि सर्व संचालकांचे स्वागत व सत्कार कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यवस्थापक मनोज मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सभेसाठी सचिव संजय ओसवाल, महादेव अण्णा कनोजे, सुरेश जैन, हेमंत शेठ, शिवचरण चौधरी, दिलीप कांबळे हितचिंतक बापट बाई, व्यवस्थापक मनोज मुंडे, वसूली अधिकारी बाळासाहेब पवार, विजय जाधव, निलेश रातवडकर, ज्योती गायकवाड, सिमा जाधव, सुमित पारखे, सदाशिव गुगळे, संतोष सुतार, प्रिती पाटेकर, सुर्यकांत कळमकर, रामचंद्र वाघरे आदी मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.