
पेण – वर्धा येथे २८ वी राज्य स्तरीय थांग- ता मार्शल आर्ट ची स्पर्धा ऑल महाराष्ट्र थांग- ता असोशीएशन आणि वर्धा थांग- ता फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम चरखागुह वर्धा येथे घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन वर्धा जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्हा थांग- ता असोशिएशन चे अध्यक्ष श्री. रविंद्र म्हात्रे ( पप्पु सर ) सहप्रशिक्षक अदीत्य तेरेदेसाई यांच्या नेत्वुवात संघ नेण्यात आला होता. या संघातील धानी थळे गोल्ड मेडल, रविना म्हात्रे गोल्ड मेडल, दिप गोरीवले सिल्व्हर मेडल, अनन्या कुमार सिलव्हर मेडल, पुष्कर म्हात्रे सिलव्हर मेडल, स्वरा म्हात्रे सिलव्हर मेडल, रितुल म्हात्रे ब्राझ मेडल, विधी अडसुळे ब्राझ मेडल, तेजश्री आयवळे ब्राझ मेडल, पार्थ शहासने ब्राझ मेडल, निझा बेयरी ब्राझ मेडल, पीहु बामणे ब्रांझ मेडल, नेहा भोईर ब्रांझ मेडल, हुसेना शिरपुरवाला ब्रांझ मेडल, पियुष पांडे ब्रांझ मेडल, आर्यन यादव ब्रांझ मेडल, धिरज पाटील ब्रांझ मेडल, अनुज म्हात्रे ब्रांझ मेडल या खेळाडुनी मेडल संपादीत केले तसेच श्र्लोक पाटील, शरवीन पाटील, अरम पुनमीया, अषिश बनकर, चिन्मय गाडे, चिराग पटेल, रुद्रेश पाटील, ओम गोपालघारे, जान्हवी पार्टी, निखिल नाईक, आसीर अनसारी, विराज मोकल, अदीत्य म्हात्रे या खेळाडूनी आपला सहभाग नोंदवुन स्पर्धा यशस्वी केली. रायगडच्या या सर्व विजयी खेळाडुंचे रायगड थांग- ता असोशीएशन चे सचिव श्री. मंदार पनवेलकर सर यांनी अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र थांग- ता असोशीएशन चे अध्यक्ष मुकूंद धुळधार सर ,सचिव महाविर धुळधार सर , राष्ट्रीय कोच रुपाली जहांगीर मॅडम ,वर्धा जिल्हा अध्यक्ष धोबळे सर उपस्थित होते.