माजी. प्राचार्य श्री. सुरेश पालकर व त्यांच्या पत्नी सुनीता सुरेश पालकर या उभयतांनी घेतला देहदानाचा निर्णय
ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत घेतला निर्णय

प्रतिनिधी – पांडुरंग माने ( गोरेगाव ) रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष तसेच माजी प्राचार्य सुरेश बाबुराव पालकर व त्यांच्या पत्नी सौ. सुनीता सुरेश पालकर या उभयतांनी एक ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून देहदानाचा निर्णय घेतला आहे.
श्री. सुरेश पालकर सर हे नेहमीच समाजसेवेसाठी आग्रही असतात ते ग्रामपंचायतीचे सदस्य देखील होते. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले आहेत. ना.म. जोशी विद्याभवन व राजाभाऊ मोने कनिष्ठ महाविद्यालय येथून २००९ साली प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये निरपेक्ष बुद्धीने अधिक गतिमान पद्धतीने काम सुरू केले. गेली पन्नास वर्षे शिक्षण क्षेत्रातील चळवळीत काम करत असताना तालुका, जिल्हा व राज्यस्तरा पर्यंत विविध पदे भूषवून प्रलंबित मागण्या विरुद्ध लढा देउन व न्याय मिळवला आहे.
असं म्हणतात धर्मादाय कार्याची सुरुवात स्वतःपासून करावयाची असते त्यामुळेच जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या शुभ दिनी देहदानचा निर्णय घेऊन एक वेगळाच आदर्श समाजासमोर श्री. सुरेश पालकर व त्यांच्या पत्नी सुनिता पालकर यांनी ठेवला आहे. देहदानाच्या निर्णयानंतर आवश्यक ती कागदपत्रे संबंधिताकडे सुपुर्द केली आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.