“युवासेना म्हसळा तालुका तर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा भेट
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर ( म्हसळा )

म्हसळा – युवासेना म्हसळा तालुका तर्फे म्हसळा पंचायत समिती कार्यालयात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ विलास करडे यांनी प्रामुख्यानं मनोगत व्यक्त करताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपुर्ण हिंदुस्थानाला गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला व मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी तसेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना संघटनेची स्थापना १९६६ साली करण्यात आली. संघटनेची शिकवण ८०%समाजकारण २०% राजकरण ह्या मुळमंत्रांवर लोकांची सेवा आजही करत आहोत असे करडे यांनी परखडपणे आपले मत मांडले.
दरम्यान, वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच म्हसळा युवासेने तर्फे पंचायत समिती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती निमित्ताने हिदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली,
यावेळी कार्यक्रमात माजी सभापती रविंद्र लाड, पं. स. अधिकारी दामोदर दिघीकर ,युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, म्हसळा शहर प्रमुख विशाल सायकर, तालुका संघटक बाळा म्हात्रे, उपतालुका प्रमुख हेमंत नाक्ती,उपतालुका प्रमुख राजाराम तीलटकर, पत्रकार संतोष उध्दरकर,शिवसैनिक जेष्ठ नरेश विचारे, अंकुश नटे, स्वानंद बोरकर व नरेश मेंदाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.