गोरेगांव विभागीय कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंत्ती साजरी.
जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप.

प्रतिनिधी – पांडुरंग माने ( गोरेगांव ) गोरेगांव विभागिय कार्यालयात हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंत्ती गोरेगाव – लोणेरे विभागा कडून साजरी करण्यात आली. सर्व प्रथम वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून वंदन करण्यात आले दरम्यान बाळासाहेबांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या शिकवणी नुसार गोरेगाव सरकारी दवाखान्यातील उपस्थित रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप जयंत्तीच्या निनित्ताने करण्यात आले.
यावेळी शिवसेना द.रायगड संपर्क प्रमुख-अरुण चाळके. शिवसेना जि. प्रमुख-प्रमोद घोसाळकर.द.रायगड महिला जिल्हाप्रमुख-सौ.निलिमाताई घोसाळकर. महिला तालुका प्रमुख सौ.अरुणा वाघमारे, महिला उप ता. प्रमुख स्वाती करकरे, लोणरे विभाग प्रमुख रवी टेंबे, प्रताप घोसाळकर, उप ता. प्रमुख जगदीश दोषी, ता. सह संपर्क प्रमुख वामन बैकर, विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर, महिला विभाग प्रमुख नंदिनी गावडे, ग्रा.पं.सदस्य रोहित शिंदे, शहर प्रमुख साक्षी गोरेगावकर, ग्रा पं सदस्य किशोरी तांबडे, युवा सेना उप विभाग प्रमुख सुशील गावडे, माजी विभाग प्रमुख जगदीश भोकरे, शैलेश महाडिक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते