Join WhatsApp Group
ताज्या घडामोडी

रा.जि.प. आदर्श केंद्र शाळा खडकोली या ठिकाणी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर (चांदोरे)

माणगाव : रा.जि.प.आदर्श केंद्र शाळा खडकोली येथे  सुनील गव्हाणे यांच्या सौजन्याने मुंबईकर मंडळ खडकोली, सुरत मंडळ खडकोली, ग्रामस्थ मंडळ खडकोली यांच्या सहकार्याने शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.                               शालेय शैक्षणिक साहित्यात लहान वही, रजिस्टर वही, दुरेघी वही, चार रेघी वही, आलेख वही, उजळणी वही, चित्रकला वही, चार्ट पेपर, घोटीव कागद, कंपास पेटी, रंगीत खडू, स्केच पेन, पेन्सिल, पेन, कलर पेटी, ब्रश, लाकडी पट्टी, पृथ्वीगोल ,भौमितिक पेटी ,स्पर्धा परीक्षा पुस्तके या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळा बांधकाम सुशोभिकरणासाठी ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ, सुरत मंडळ खडकोली यांनी आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे शालेय रंगरंगोटी साठी व हँडवॉश स्टेशन साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळ सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामसेवक यांचे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती यांनी बागकाम लाल माती भरावासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल या सर्वांचे शाळेकडून आभार मानण्यात आले. सोबतच शाळेतून प्रशासकीय बदली झालेले व विद्यार्थी प्रिय शिक्षक जितेंद्र बोडके पदोन्नती मुख्याध्यापक व निलेश पाष्टे सर यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करून निरोप समारंभ करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच शितल वारीक, सदस्य प्रमिला पवार, सदस्य संदेश पवार ग्रामस्थ तुकाराम पवार, नामदेव राणे, गणपत राणे, शंकर पवार, पांडुरंग महाडिक, अजय महाडिक, दिपक चव्हाण, योगेश वारीक ,प्रवीण जंगम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वृषाली पवार,उपाध्यक्ष मोहिनी सुतार, अनिता राणे, अर्पिता महाडिक, प्रिया अंधेरे, उषा सुतार, चैताली सुतार, रोहिता लोखंडे, वैशाली सुतार, रवीना सुतार, किशोरी सुतार, पुष्पलता अंधेरे, सुचिता अंधेरे, रेखा पालांडे, प्रिया सुतार या महिला उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश अंधेरे, प्रास्ताविक मुख्याध्यापक कुंजलता पाटील , शैक्षणिक महत्त्व मार्गदर्शन मंगला भोसले व आभार विठाबाई लाखाडे यांनी केले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये