सामाजिक
यशश्री शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या सकल हिंदू समाज तळा तर्फे तहसीलदारांना निवेदन.
प्रतिनिधी - श्रीकांत नांदगावकर ( तळा )

उरण येथे झालेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज तळा तर्फे तहसीलदार स्वाती पाटील यांना देण्यात आले. उरण तालुक्यातील सातराठी येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे हिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मानवजातीला काळीमा फासणारी ही घटना असून या प्रकरणाचा संपूर्ण जिल्हाभरातुन निषेध नोंदविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर तळा तालुका सकल हिंदू समाजातर्फे या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार स्वाती पाटील यांना देण्यात आले आहे. या प्रसंगी तळा तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.