Join WhatsApp Group
सामाजिक

देवखोल गांव स्वप्नातील गाव म्हणून सन्मानित

प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे )

चांदोरे – श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल हे गाव स्वप्नातील गावाचे ७६% मापदंड पूर्ण करून स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले. गाव विकास समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन गाव विकास करण्याच्या व आदर्श गाव करण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू केले. स्वदेस फाउंडेशन च्या सहकार्याने गावकऱ्यांनी स्वच्छ, सुंदर, स्वास्थ, साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली, गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी गावातील महिला व युवक यांनी हिरीरीने मोठा सहभाग घेतला व आपले गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित केले.

स्वेदस फाऊंडेशन मार्फत झालेले घरोघरी नळ पाणीपुरवठा योजना, प्राथमिक उपचार पेटी, घरोघरी सोलार तसेच वेगवेगळ्या उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात आल्या. 100% घराकडे फळबाग लागवड केली आहे. गावा मध्ये 100% लोकांचे बँक खाते आहे, घर पक्के व रंगीत आहे, आरोग्य विमा, घरगुती गॅस, घरे घरगुती सोलर वापरतात, लोकांचे आधार कार्ड, लोकांचे जातीचे दाखले आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक उत्पन्न वाढ होण्याच्या दिशेने वाटचाल, मोतीबिंदू मुक्त गाव आहे, 0 ते 16 वयोगटातील 100% मुले शाळेत जातात. तसेच गावाने ४ लाखाचा फंड गोळा केला, तसेच मुंबई मंडला मार्फत दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोळा साजरा केला जातो. तसेच शालेय साहित्याचे वाटप केले जाते.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपसंचालक प्रसाद पाटील सर वरिष्ठ व्यवस्थापक श्री.शिवतेज सर, तसेच व्यवस्थापक नाथजी कटरे सर, महाले कृषि अधिकारी, शुभांगी सोनावने ग्रामसेवक मैडम आणि श्रीवर्धन स्वदेस टीम उपस्थित होते. कृषि अधिकारी यानी कृषि योजनांची माहिती दिली. प्रसाद सर यांनी आपण जे आता ७६% पर्यंत आहोत ते शंभर टक्के पर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो व आपण या केलेल्या कामाचे सातत्य कशा पद्धतीने टिकवू शकतो हे समजावून सांगितले. त्यांनी ग्रामस्थांनी केलेल्या प्रगतीचे खूप खूप कौतुक केले  तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वप्नातील गाव घडविण्यासाठी गाव विकास समितीचे सर्व सदस्य, बचत गटांमधील महिला, युवक व ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ स्वदेस फाऊंडेशन टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे गाव स्वप्नातील गाव प्रमाणित केले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये