
गोरेगाव – चिंचवली गांवचे सुपुत्र तथा सुतार समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र धोंडू मेस्त्री यांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. श्री.नागोराव पांचाळ ( प्रदेश अध्यक्ष आणि विश्वकर्मा वंशिय समजा संघटनेचे संस्थापक ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी नगर वेरूल येथे विश्वकर्मा जयंती आणि आधिवेशन मेळावा संपन्न झाला ह्या अधिवेशन कार्यक्रमाला राज्य भरातुन समाज बांधव एकवटले होते. यावेळी समाजासाठी नेहमी झटणारे आमदार भरत शेट गोगावले यांचे कट्टर समर्थक सुतार समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र धोंडू मेस्त्री यांचा विश्वकर्मा वंशिय समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कडून समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. समाजाकडून समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने रामचंद्र मेस्त्री यांच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
यावेळी रायगड जिल्ह्याचे कार्यकर्ते किशोर कार्लेकर, सुनिल नांदगावकर, सुरेंद्र देऊळकर . दिलीप पांचाळ, बाळकृष्ण सुतार, संतोष सुतार, रवी सुतार आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.