35 वर्षीय तरुणाचे 12 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे; दादर सागरी पोलीस स्टेशनला पोक्सो गुन्हा दाखल
प्रतिनिधी - किरण बांधणकर ( पेण )

पेण – तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी १२ वर्षीय चिमुकली बेडरूम मध्ये झोपली असताना कळवे येथील ३५ वर्षीय तरुण सचिन पेंटर नामक आरोपीने घराच्या बेडरूम प्रवेश करत सदर अल्पवयीन मुलीच्या अंगाला हात लावून अश्लील चाळे केले. मात्र फिर्यादीच्या सदर बाब निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठत कळवे येथील सचिन पेंटर नामक आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेमुळे हमरापूर विभागासह पेण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
सविस्तर घटना अशी की, दादर सागरी पोलीस स्टेशन हद्दीत २८ एप्रिल ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी च्या दरम्यान कळवे येथे सदर पीडित मुलगी ही आपल्या नातेवाईकांसोबत लग्न कार्यासाठी आली असता आरोपीने घराचे बेडरूम मध्ये महिला फिर्यादी यांची मुलगी वय १२ वर्षे ०६ महीने ही घराचे बेडरूम मध्ये झोपली असता तसेच पिडीत मुलगी हि अल्पवयीन आहे हे आरोपी यास माहीत असताना देखील तिच्या एकट्यापणाचा फायदा घेत आरोपी सचिनने पिडीत मुलीच्या शरीराला हात लावुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे घृणास्पद कृत्य केले सोबतच अश्लील चाळे करीत राहिला होता परंतु सदर घटना ही घरातल्यांच्या लक्षात आल्याने पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
सदर घटने बाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ८०/२०२४ भा. दं. वि. क. ३५४, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) अधिनियम, २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दादर सागरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गुरुनाथ विशे हे अधिक तपास करीत आहेत.