Join WhatsApp Group
ताज्या घडामोडी

दररोज वीज जात असल्याने उरणकर नागरिक हैराण

अखंडीत वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी

 

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) अन्न वस्त्र निवारा याचबरोबर वीज सुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे विजे शिवाय चालूच शकत नाहीत. टीव्ही मोबाईल फॅन कुलर ऐसी फ्रीज इलेक्ट्रॉनिक वाहने आणि उपकरणे विजे शिवाय चालूच शकत नाही. विजेचा वापर आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतच चालली आहे. मात्र उरण मध्ये या अत्यावश्यक सेवेचा तीन तेरा वाजले आहे. गेली ४ ते ५ दिवस दररोज पहाटे उरण शहरात वीज बंद होत आहे. पहाटे पहाटे वीज पुरवठा बंद होत असल्यामुळे उरण शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. सारखी दररोज वीज जात असल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, ऐसी, कुलर आदी उपकरणे बंद पडत आहेत. याचा आर्थिक फटका विनाकारण ग्राहकांना बसत आहे. पहाटे कधी ४ वाजता तर कधी पहाटे ५ वाजता वीज घालवीत असल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात झोपमोड होत आहे. सारखी वीज जात असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. ग्राहकांना वीज बिले वेळेत दिली जातात. पैसे नाही भरले तर मीटर कापून नेले जाते. वीज पुरवठा बंद केला जातो. मात्र ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरून सुद्धा ग्राहकांना महावितरण तर्फे विजेची चांगली सुविधा मिळत नसल्याने उरण मधील जनता महावितरणच्या कारभारावर प्रचंड प्रमाणात नाराज आहेत.

दररोज पहाटे उरण शहरात वीज घालवली जाते. त्याचा नाहक त्रास जनतेला होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत आहे. महावितरण तर्फे नियमितपणे, अखंडीत वीज पुरवठा झाली पाहिजे.
– शुभम उरणकर, नागरिक,उरण.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये