संत रोहिदास तरुण मंडळ रजि. पुरस्कृत गोरेगांवचा राजा गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज
गोरेगांव नगरी मध्ये घुमणार गोरेगांवच्या राजाचे जयघोष

प्रतिनिधी – पांडुरंग माने ( गोरेगांव ) माणगांव तालुक्यातील गोरेगांव शहरात कार्यरत असलेले संत रोहिदास तरुण मंडळ रजि. पुरस्कृत गोरेगांवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा यशस्वी रित्या ३७ व्या वर्षात पदार्पण करित आहे. १२ बलुतेदार, १८ पगड जातींचे समावेश असलेले व वैशिष्टय़ म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांना एकत्रित करून लोकमान्य टिळकांचे राष्ट्रीय एकोप्याचे निर्धाराने चालण्याचे सर्वोत्तम उदाहरण कायम करताना हे मंडळ आपल्याला नेहमीच दिसते.
स्त्री भ्रूण हत्या, पाणी प्रश्ण, २६/११ दहशतवादी हल्ला, ग्लोबल वॉर्मिंग, २००५ महापूर इ. असे समाजातील ज्वलंत विषयांवर विक्रमी देखावे साकारून रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील अनेक स्पर्धेत भाग घेऊन आपले नावलौकिक ह्या मंडळाने कमावले आहे. रायगड जिल्हा पोलिस विभाग, झी २४ तास इकोफ्रेंडली गणराया, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण अशा विविध पुरस्काराने सन्मानित असलेला हा मंडळ, गणेशोत्सवात जेवढा जल्लोश साजरा करतो तेवढाच जोमाने सामाजिक पातळीवर सुद्धा कार्यरत आहे. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अतिवृष्टीला सामोरी गेलेल्या नागरिकांना मदत कार्य इ. असे अनेक उपक्रम हे मंडळ वर्षभरात राबवते.
मंडळाच्या सर्व साधारण सभेत उत्सव कार्याध्यक्ष पदी अक्षय सुनिल गोरेगांवकर, उपकार्याध्यक्ष पदी रविंद्र हरिभाऊ मुंढे, सचिव वैभव सुनिल गोरेगांवकर, सहसचिव अभिषेक मारुती गोरेगांवकर, खजिनदार निकेश रमेश गोरेगांवकर, सहखजिनदार सौरभ सत्यवान चांदोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच सदस्य पदी अमोल र. गोरेगांवकर, विनायक न.गोरेगांवकर, आदित्य र. गोरेगांवकर, राकेश भ. गोरेगांवकर, प्रसाद र. जाधव, मिहीर सं. गोरेगांवकर, कैलास हि. गोरेगांवकर, विष्णु ह. गोरेगांवकर, विशाल र. भुसकूटे, किशोर कृ. कापडेकर, महेंद्र गौ. म्हशेकर, ओमकार रा. गोरेगांवकर, केतन वि. गोरेगांवकर. तसेच सल्लागार पदी नीलेश य. गोरेगांवकर, प्रसाद र. गोरेगांवकर, सचिन न. गोरेगांवकर, भारत वि. गोरेगांवकर, अशोक आंबेतकर, राम कृ. कापडेकर, चंद्रकांत वि. गोरेगांवकर, समीर च. गोरेगांवकर, महेंद्र पा. वायडे, उदय उ. गोरेगांवकर संतोष हि. गोरेगांवकर, उत्तम उ. गोरेगांवकर यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली आहे.