Join WhatsApp Group
राजकीय

माझ्या सारखा तरुण विधानसभेत पाठवा विमानतळ प्रकल्पात ५ हजार तरुणांना रोजगार देऊ – प्रितम म्हात्रे

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरीब जनतेच्या हृदयातील पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पैसे किंवा गाड्या देऊन इथे आणले गेले नाहीत आणि शेतकरी कामगार पक्ष कधी आणत नाही. हे आलेले कार्यकर्ते मनातून आलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा इतिहासच असा आहे की, कितीही मोठी व्यवस्था करा, मात्र कार्यकर्त्यांना उभे राहावेच लागते. एवढी अफाट गर्दी कार्यकर्त्यांची असते. हा शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. माझ्यासारखा तरुण विधानसभा सभेत पाठवा विमानळ प्रकल्पात ५ हजार तरुणांना रोजगार मिळवून देऊ असे आश्वासन प्रितम म्हात्रे यांनी दिले.शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकारी व पदनियुक्ती मेळावा उरण येथील जेएनपीटी टाऊनशिप येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रितम म्हात्रे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.

यावेळी सभागृह खचाखच भरून, कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाहेर उभे होते. मेळाव्यात प्रितम म्हात्रे बोलण्यास उभे राहताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. यापुढे बोलताना प्रितम म्हात्रे यांनी बऱ्याच पक्षांच्या या सभागृहांमध्ये बैठका सभा झाल्या. त्यावेळी त्या सभांमधून पोस्टर हिरो म्हणून मला त्यांनी उपमा दिली. पण मी सांगू इच्छितो हा पोस्टर हिरो नाही तर तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या मनातला हिरो आहे. हे तुम्हाला सांगू इच्छितो. आज माझ्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला. म्हणजे शेतकरी कामगार पक्षावर निष्ठा असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. तुमच्या मनाने आणि तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाने शेकापक्षात तुम्ही परतलात तुमचे मनापासून स्वागत आहे. माझ्या आदिवासी बांधवांचा देखील पक्षप्रवेश आहे. आदिवासी बांधव म्हणजे नेहमी पैशाने विकत घेतला जातो अशी उपमा त्यांना दिली जाते पण हे आदिवासी बांधव निष्ठेने, स्वतः कामातून मिळविलेल्या उत्पन्नातून ते माझ्यासाठी आज या मेळावासाठी उपस्थित राहिले आहेत त्यांना माझा सलाम आहे. विमानतळाच्या नावाखाली खूप राजकारण चालते परंतु महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना, सर्वात पहिली मुलाखत देण्याचे भाग्य या प्रीतम म्हात्रे लाभले. त्यावेळी चर्चा करताना, मी सांगितले की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जरी असते, तरी त्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्याच नावाला दुजोरा दिला असता अशा प्रकारच्या भूमिकेतून मी माझे मत मांडले. प्रीतम म्हात्रे यांना शेतकरी कामगार पक्षांने स्वार्थासाठी विधानसभेसाठी पुढे आणले आहे परंतु असा भाग नाही. उरणच्या घारापुरी येथे कोरोना काळामध्ये रेशन घेऊन घारापुरीला पहिला जो कोणी पोहचला असेल, तो प्रितम म्हात्रे पोहोचला.

त्या ठिकाणी कोणीही गेलं नाही. पण प्रीतम म्हात्रे पोहोचला हे काय मी काढत नाही त्यावेळी गरज होती. पैसा असून देखील तो उपयोगी येत नव्हता. तर ओळख महत्त्वाची होती. मदत महत्त्वाची होती असे सांगून, वाघाला आपल्याला पिंजऱ्यात बघायची सवय नाही. तो बाहेर येऊन आशीर्वादाची डरकाळी फोडेल. त्यावेळी समजेल इथला तरुण, भूमिपुत्र काय आहे तो. दरम्यान कर्नाळा बँकेचे ९६.३३ टक्के लोकांचे पैसे व्याजासहित परत केले आहेत. उरलेले पैसे म्हणजे एकशे दहा कोटी रुपयांची रक्कम परत करायची आहे. ती लवकरात लवकर परत केली जाईल. त्याच्या अगेन्स साहेबांचे ८४० कोटीची प्रॉपर्टी गहाण आहे. असे सांगून वातावरणे तापविली जातात. साहेब ही रक्कम द्यायला तयार आहेत. परंतु राजकीय हव्यासापोटी ते देऊ नयेत. ते आम्हाला व्याजासहित मिळाला पाहिजे. असे ऍड. ठाकूर यांनी मागणी केली आहे. प्रीतम म्हात्रे यांना आम्हीच उभे केले असे समोरचे सांगतात. आता शेतकरी कामगार पक्षांनी आणि नेते मंडळींनी प्रीतमला पाडायला उभे केले का असाही सवाल त्यांनी यावेळी केला. प्रितम म्हात्रे नावाचा दबादबा विरोधकांनी घेतला आहे. अहो शेतकरी कामगार पक्षाचा प्रितम म्हात्रे एक साधा कार्यकर्ता आहे. त्याचा धसका घेण्याची काहीच गरज नाही. यावेळी २०० हून अधिक कार्यकर्त्यांची शेतकरी कामगार पक्षात पदाधिकारी पदनियुक्ती करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे गेलेले दिवस परत आणायचे असतील तर सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. विरोधकांना त्याचा फायदा होता कामा नये असे त्यांनी सांगितले. नोकरीच्या प्रश्नावर बोलताना नोकरीचा प्रश्न या भागात मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. एअरपोर्ट रोजगाराचा विचार केला तर शेतकरी कामगार पक्ष आणि जे. एम. म्हात्रे संस्थेच्या नावाने कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता येथील गरजू गरजवंतांना प्रशिक्षण दिले जाते .एअरपोर्ट स्किल प्रमाणे नोकरी दिली जाईल. त्या प्रकारचे सर्टिफिकेट इथल्या तरुणांना मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ४३ जणांना मुंबई एअरपोर्ट मध्ये काम दिले गेले आहे. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जागा झाला आहे. आपल्याला पद असो नसो शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरतो. शेतकरी कामगार पक्षाला विधानसभेची काम करण्याची संधी मिळाली तर कमीत कमी पाच हजार पोरांना नोकरी देण्याचा आश्वासन मी देत आहे. असेही ते म्हणाले तसे आम्ही प्रयत्नही सुरू केले आहेत. शेतकरी कामगार पक्ष आणि ज्येष्ठ नेतेमंडळी जो आपल्याला आदेश देतील त्या आदेशाची आपण अंमलबजावणी करायला पाहिजे तो आदेश आपल्या हिताचा असेल असेही ते म्हणाले. यावेळी जे.एम.म्हात्रे, नारायण घरत विकास नाईक,रविंद्र घरत आदींनी मनोगत व्यक्त केले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये