चांदोरे गावदेवी मंदिराच्या कामाला सुरुवात ; आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कडून भरघोस निधी
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे/माणगाव )

चांदोरे – माणगाव तालुक्यातील स्वप्नातील आदर्श गावं चांदोरे गावदेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला होता त्यावेळी गावदेवी मंदिरामध्ये दर्शन घेत देवीला साकडं घालून त्याच मंदिराचे मोठ्या स्वरूपाचे तसेच आकर्षित असे मंदिर उभारण्याकरता सर्वांचे लाडके एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष कार्यसम्राट श्री. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले होते. भुमिपुजनानंतर या गांवदेवी मंदिराच्या कामाला सुरुवात झाली असून स्थामिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
भुमिपुजनावेळी मा. सभापती सुजित शिंदे यांनी पंचक्रोशीच्या वतीने आ. भरतशेठ गोगावले यांना आश्वासित करित आपण जसे विकास कामांना भरघोस निधी देऊन विकास काम पूर्ण केलीत त्याप्रमाणे येत्या निवडणुकीमध्ये चांदोरे व पूर्ण पंचक्रोशितून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेब यांच्या शब्दाचा वजन राखून त्यांनी दिलेला शब्द चांदोरे पंचक्रोशीतील मतदारांनी पाळला, भरतशेठ गोगावले यांना पुन्हा आमदार पदी निवडून आणले नुसते आमदार नाही तर मंत्री पद देखील मिळाले आहे. या गांवदेवी मंदिराकरिता भरतशेठ गोगावले यांनी भरघोस निधी देत सप्टेंबर महिन्यात गावदेवी मंदिराचे भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर चांदाेरे गांवदेवी मंदिराच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली असून काम अगदी जलद गतीने पुर्ण करित या गांवदेवी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पार पाडण्याची आतुरता आता चांदोरे आणि पंचक्रोशितील ग्रामस्थांना लागली आहे.