Join WhatsApp Group
ताज्या घडामोडी

अपहार प्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक

जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा झाला होता दाखल; न्यायाल्याकडून अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर परदेशीं पलायनाचा होता प्लान.

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे  ( उरण ) नवी मुंबई मधील नेरुळ, सिवूड्स येथे राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याला तब्बल ३ कोटी ३० लाखांचा उरणमधील जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी-बबलीच्या जोडीने गंडा घाटल्याची घटना घडली होती. याबाबत नवी मुंबई, एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपिंना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनाच्या प्रयत्नात असताना, या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानातळावरून अटक करण्यात आली आहे.

मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दांपत्याला नोकरी देतो असे सांगून, ‘लिव्ही ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यातील आरोपी बंटी, बबलीने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात दाद मागीतली होती. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटालला होता. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला समोर जात कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणून, परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता, या जोडीला दिल्ली विमानतळावर अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायाल्याने या प्रकारानंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून, जुगनू कोळी याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दांपत्याच्या दोनही मुलांचे दोन वर्षांचे  शैक्षणिक नुकसान झाले आहे. याबाबत नवीमुंबई एनआरआय पोलीस ठाण्यात कलम ४०६, ४२०, ४६५ अन्वये गुन्हा दाखल आहे.आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये