मुरूड – तळा – स्वारगेट – पुणे बस बंद केल्याने तळा तालुक्यातील प्रवाश्यांचे हाल ; बस कमतरतेचे कारण पुढे करत बस बंद.
मुरूड - तळा - स्वारगेट - पुणे बस त्वरीत सुरू न केल्यास तळा तालुका विकास आघाडी करणार आंदोलन.

प्रतिनिधी – किशोर पितळे ( तळा ) मुरूड – तळा – स्वारगेट – पुणे बस दिवाळी सणा निमित्ताने बस सुरू केली होती. सदर बस सुरू झाल्याने मुरूड, तळा, माणगाव, इंदापूर भागातून मोठ्या प्रमाणावर प्रवाशी वर्गाचा उत्तम प्रतिसाद या बसला मिळत होता. दिवाळी नंतर मतदानासाठी पाठवलेल्या गाड्या नियमीत येत होत्या. पुढे आळंदी यात्रेचे कारण सांगून ही बस जवळ पास आठवडा भर बंद करण्यात आली. या बसने प्रवाशी घाटमाथ्यावर किंवा पुणे येथे जाण्यासाठी एकमेव या बसने प्रवास करत होते. या पुर्वी रोहा आगारातून तळा – पुणे बस कित्येक वर्षे चालू होती पण कोरोना काळात ठरलेली कारणे देऊन बंद करण्यात आली. तळा भागातून प्रवाशी असल्याने इंदापूर – माणगांव येथे जाऊन प्रवाशांना गाडी पकडावी लागते.
तळा वाहतूक नियंत्रक कक्षात वारंवार चौकशी करून सदर गाडी मुरूड आगारातून येत नाही. मुरुड आगारातून व्यवस्थीत माहीती पुरवत नसल्याने तळा वाहतूक नियंत्रकांना प्रवाश्यांच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. आमच्या प्रतिनिधीने मुरूड आगारात संपर्क साधला असता पाच ते सात बस कमी पडत असल्याने सदर बस पर्यायाने बंद करावी लागली. याबाबत विभागीय नियंत्रक पेण येथे समस्या मांडा असे सांगून वेळ मारून नेली त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिद वाक्याला अधिकारी तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत विभागीय नियंत्रक पेण येथे फोन करून संपर्क साधला असता दिपक घोडे यांनी सांगितले रायगड विभागात बसच कमी पडत असल्याने काही बस बंद कराव्या लागल्या आहेत. मात्र बंद केलेल्या बस सुरू करण्या बाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दिवसेंदिवस प्रवाशी संख्या वाढत असताना आणि उत्तम प्रतिसाद मिळत असून महामंडळाने ही बस सेवा बंद केली आहे. पुणे किंवा घाटमाथ्यावरून अनेक पर्यटक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महीला, नोकरदार, मोठ्या प्रमाणावर येत-जात असतात. सदर बस वर प्रवाशी अवलंबून असतात असे असताना अचानक बस बंद केल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत. तरी मा. विभागीय नियंत्रक साहेब पेण यांनी मुरूड आगार किंवा रोहा आगारातून कायम स्वरूपी बस सेवा सुरू करण्याची प्रवाशी वर्गातून मागणी केली जात आहे सोबतच एस टी. महामंडळाचे अध्यक्ष आमदार मा. भरतशेठ गोगावले यांनी देखील या बाबीकडे लक्ष घालावे अन्यथा मुरूड – तळा – स्वारगेट – पुणे बस सेवा त्वरीत सुरू न केल्यास तळा तालुका विकास आघाडी तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.