महावितरणाचा अंदाधुंदी कारभार…सामान्य जनतेच्या खिशाला पडतोय आर्थिक भार..
विद्युत मीटर तसेच वापर नसतानाही आकारण्यात आले तब्बल १६५०० रुपयांचे बिल.

प्रतिनिधी – नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे/माणगाव ) चांदोरकर संकुल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित मौजे चांदोरे येथे विजेचा वापर नगण्य असताना भरमसाठ विद्युत आकारणी करण्यात आल्याने महावितरण कंपनीचा अंदाधुंदी तसेच मनमानी कारभार चालू असल्याची खंत चांदोरकर संकुल सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) या संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य यांनी व्यक्त केली आहे.
चांदोरकर संकुल सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.) संस्थेच्या मालकीची मौजे चांदोरे स्थित भूमापन सर्व्हे क्र.१७२/४ ही १६४ एकर बिनशेती जमीन असून सदर भूखंडावर पाणी व विज या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी दोन बोअरवेल खणण्यात आल्या असून विज पुरवठा व्हावा म्हणून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर संस्थेच्या स्वखर्चाने बसविण्यात आला आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या विज आकारणीसाठी महावितरण मंडळाकडून ग्राहक क्र.०३८९४०००३१८८ मिटर देण्यात आला होता, सदर ग्राहक क्र.०३८९४०००३१८८ चे विद्युत देयक व्यावसायिक दराने येत असल्यामुळे सहाय्यक अभियंता मोर्बा यांच्या सल्ल्यानुसार व्यावसायीक ऐवजी निवासी दराने आकारणी होण्यासाठी नविन मीटर करिता रितसर अर्ज केला होता, यासाठी आवश्यक ती रक्कम भरली त्यात थकीत रकमेचाही समावेश होता, वारंवार अर्ज विनंत्या करून सुधा नविन मीटर काही मिळाला नाही शिवाय जुन, जुलै २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ट्रान्सफॉर्मर मधे बिघाड झाल्यामुळे सदर ट्रान्सफॉर्मर महावितरण कंपनी मार्फत दुरुस्तीसाठी कोणतीही सूचना न देता परस्पर काढून नेण्यात आला होता.
दरम्यान सदर भूखंडाचा संपूर्ण वीजपुरवठा बंद होता मीटर बदलीच्या अर्जा नंतर व्यावसायिकचे निवासी मीटर आकारणी करिता जवळ जवळ ३/४ महिने इतक्या कालावधीत नंतर नविन विद्युत मीटर ०३८९४०००३९९४ या ग्राहक क्रमांकाने मिटर बसविला गेला. साधारणपणे २३ फेब्रु. २०२४ रोजी हा मीटर बसविला गेला. यानंतर अचानकपणे फेब्रुवारी २०२४ रोजी महावितरण कडून १६५०० रुपयांचे विजदेयक पाठविण्यात आले हे बिल अचंबित करणारे होते, सहा महिने निष्क्रिय असलेल्या मीटर क्रमांक ०३८९४४०००३१८८ या जुन्या मीटरसाठी संस्थेला १६५०० रू विद्युत देयक पाठविण्यात आले. सदर बाबतीत तक्रार करूनही महावितरण कपंनी कडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तसेच दिवसेंदिवस कोणताही वापर नसतांना सदर बिलामध्ये दर महिन्याला भरमसाठ वाढ करून वीजबिल पाठविण्यात येत आहे, हा चमत्कार फक्त महावितरण करू जाणे ! असे प्रतिनिधींशी बोलताना चांदोरकर संकुल सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
———————————————-
वापरात नसेलेला मिटर ३१८८ या क्रमांकांचे बिल बंद करणे अवश्यक होते, हा मिटर बदली न करता आणि तो मिटर जाग्यावर नाही आहे तरी देखील बिल येत आहे,आणि तो मिटर दुसरी कडे कोणी वापरत असणार असे म्हणणे आहे, आम्ही डिव्हिजन ऑफिसला संपर्क करून हा विषय मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुढे बंद असलेल्या मिटरचे विज आकार बिल येणार याची दक्षता घेऊ.
राहुल नवगुणे, सहाय्यक अभियंता, माणगांव.
महावितरण कार्यालय, मोर्बा