श्री क्षेत्र मांगवली येथे श्री सोमजाई मातेच्या उत्सव सोहळ्याचे आयोजन..!
प्रतिनिधी - महेश शेलार ( माणगांव )

माणगांव – प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी माणगांव तालुक्यातील नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी श्री क्षेत्र मांगवली येथील जागृत देवस्थान असलेल्या सोमजाई देवीचा उत्सव सोहळा शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी मांगवली येथे मोठ्या उत्सहात साजरा होणार असून या सोहळ्याचे १२ वे वर्ष सुरु आहे. तरीही या सोहळ्यासाठी सर्व आजूबाजूच्या तसेच बाहेरून येणाऱ्या देवीच्या भक्त गणांनी अवश्य उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमजाई मातेचे निश्चिम भक्त विजय काशिराम पाखुर्डे यांनी केले आहे.
मांगवली येथील सोमजाई मातेच्या उत्सवाची सुरुवात स. ७ वा. अभिषेक, स. ८.३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, स. ११ वा. नाचाचे जंगी सामने डबल बारी – शक्तिवाली शाहीर तेजल पवार – खालगाव – रत्नागिरी श्री भैरी भवानी नृत्य मंडळ मुंबई तसेच तुरेवाले शाहीर जगन्नाथ खारगांवकर – कुडगांव श्रीवर्धन ओम साई नृत्य कला पथक यांचे होणार आहे. दु. १२ वा. श्री सोमजाई देवीचा महाप्रसाद, संध्या. ७.३० वा. श्री सोमजाई ग्रामस्थ मंडळ मांगवली यांचे भजन होणार आहे. रात्री ठिक ९.३० वा. सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे – मेंढापूर यांचे जागरण गोंधळ ऑर्केस्ट्रा होणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचा व तीर्थप्रसादाचा लाभ आजूबाजूच्या परिसरातील तसेच बाहेरून येणाऱ्या देवीच्या भाविक भक्तांनी घ्यावा.
या कार्यक्रमाचे आयोजन सोमजाई मातेचे भक्त तसेच छावा संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय काशिराम पाखुर्डे मांगवली हे दरवर्षी स्वखर्चाने करत असतात तसेच मांगवली ग्रामस्थ व महिला मंडळ आणि मुंबईकर मंडळ यांचे मोलाचे सहकार्य असते. तसेच नियोजन समाधान उतेकर, संतोष खडतर – सरपंच, सुवर्णा जाधव, नामदेव हळदे, राजेंद्र सकपाळ, संकेत पाखुर्डे, विशाल साळवी, रमाकांत पाटील, नंदू पालकर सहनियोजन अमर दसवते, मंगेश पवार – उपसरपंच, बाबु पाखुर्डे, अनिल जोशी, अल्पेश मोरे, ज्ञानेश्वर वाढवळ, राजेंद्र गोलंबरे, संतोष जाधव, रमेश पाखुर्डे – अध्यक्ष मांगवली, सुरज पाखुर्डे, गोरख वाघोसकर, दिलीप मुंडे यांनी केले आहे.