प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणा बरोबर चॅम्पियन कराटे क्लब तर्फे स्वसंरक्षणाचे धडे मिळणार
विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) श्री रविप्रभा मित्र संस्था व चॅम्पियन कराटे क्लब यांच्या संकल्पनेतून व पंचायत समिती यांच्या सहकार्याने म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणा बरोबर स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असून या कार्यक्रमाची सुरुवात मराठी शाळा नं. १ कन्याशाळेत आयोजित करून विद्यार्थिनी यांना चॅम्पियन कराटे क्लबचे प्रशिक्षक अविनाश मोरे व रितेश मुरकर तसेच त्यांच्या टिमने प्रात्यक्षिक दाखवुन विद्यार्थिनी यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले
तसेच गुड टच बॅड टच या बाबतीत देखील सांगण्यात आले, या स्वसंरक्षण प्रशिक्षणामध्ये शाळेतील काही विद्यार्थिनी यांनी देखील प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपले स्वसंरक्षण कसे करायचे याचा अनुभव घेतला.
यावेळी काही पालकांनी व विदयार्थिनी यांनी स्वतःचे रक्षण कसे करायचे, सक्षम कसे बनायचे, निर्भय कसे रहायचे या बाबतीत प्रशिक्षकांना प्रश्न विचारून उपस्थित मान्यवरांची व प्रशिक्षक यांची मने जिंकली, या बाबतीत संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड तसेच प्रशिक्षक रितेश मुरकर, अविनाश मोरे यांनी या मुलींचे कौतुक केले. असे विदयार्थीनी असतील तर आम्हाला कराटेचे धडे देण्यात अधिक उत्साह वाढेल व विद्यार्थीनी हे देखील स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करून निर्भय व सक्षम बनतील अशी मला खात्री आहे असे प्रशिक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि महाराष्ट्रात जे काही लहान मुलींवर अत्याचार होत आहेत यासाठी मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे म्हणुन आम्ही या प्रकारे प्राथमिक शाळांमध्ये १० दिवसाचे स्वसंरक्षण कार्यशाळांचे आयोजन करून मुलींना सक्षम बनविणार असे सांगण्यात आले पण यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागा कडुन सहकार्य मिळत नसल्याने लाड यांनी खंत देखील व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शाशिकांत शिर्के यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप शिंदे सरांनी यांनी केले तर प्रस्थाविक संस्थेचे सचिव संतोष उध्दरकर यांनी केले, यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड, जेष्ठ समाजसेवक शांताराम घोले,प्रशिक्षक रितेश मुरकर, अविनाश मोरे, व्यवस्थापन अध्यक्ष शशिकांत शिर्के, दिपक पाटील, विस्तार अधिकारी अरविंद मोरे सर, मुख्याध्यापिका खेडेकर मॅडम, उपाध्यक्षा स्नेहल निजामपुरकर,अंगणवाडी सेविका मयूरी दर्गे, संख्येचे सचिव संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, सदस्य समीर लांजेकर, संतोष घडशी, सुजित काते, किशोर घुलघुले,कोल्हे सर, तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते.