मोबाईल हिसकावल्याचे चुकीचे वृत्त विरोधकांनी जाणीवपूर्वक पसवरले
चंद्रकांत कळंबे व विकास गोगावले याची संयुक्त पत्रकार परिषद

प्रतिनिधी – देवेंद्र दरेकर ( पोलादपूर ) पोलादपूर तालुक्यात तसेच महाड आणि माणगांव तालुक्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांचा मोबाईल युवासेना कार्यकारणी सदस्य विकासशेठ गोगावले यांनी हिसकावत खेचल्याचे फेक नरेटीव मतदार जनतेमध्ये जाणीवपूर्वक पसरविले जात आहे. चुकीचे वृत्त पसरविण्यात विरोधक अग्रेसर असल्याचा आरोप पोलादपूर शिवसेना कार्यलयात पत्रकार परिषद दरम्यान चंद्रकांत कळंबे व विकास गोगावले यांनी नाव न घेता स्नेहल जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे
या पत्रकार परिषदेत मोबाईल हिसकावल्याचा हा प्रकार हास्यास्पद असून पूर्वी उमेदवारांचे वडील स्वर्गीय माणिक जगताप यांनी महाडमध्ये पोलादपूर फोडला माणगाव फोडला आणि पोलादपूरमध्ये महाड शहर फोडला महाड तालुका फोडला अशा खोट्या वल्गना करीत असत आता तेच त्यांच्या कन्या उमेदवार स्नेहल करत आहेत. आता बाप से बेटी सवाई अशा प्रकारची खोटं पसरविण्याची भाषा प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केली जात आहे, असा समाचार चंद्रकांत कळंबे आणि विकासशेठ गोगावले यांनी पोलादपूर शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये आयोजीत संयुक्त पत्रकार परिषदेत घेतला.
आमदार गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या विराट सभेमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपले भाषण ऐकले असते तर आमदार गोगावले यांचा समर्थक आणि प्रचारक म्हणून मी कट्टर शिवसैनिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले असते. मात्र ज्यांनी फेक नरटीव पसरवून पोलादपूरच्या मतदार जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना येत्या 23 तारखेला मतदार जनता गोगावले यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवून देण्यासाठी दहा हजारांचे मताधिक्य एकट्या पोलादपूर तालुक्यातील देईल, तेव्हा कळंबे यांची निष्ठा समजून येईल असे चंद्रकांत कळंबे यांनी यावेळी सांगितले.
मोबाईल खेचल्याच्या प्रसंगाबाबत विकासशेठ गोगावले यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी चंद्रकांत कळंबे आणि आपले नाते काका पुतण्यासारखे असल्याचे सांगितले. यावेळी विकासशेठ गोगावले यांनी निवडणुकीचा अर्ज भरण्या आधी पासूनच प्रतिस्पर्धी उमेदवार यांचे नाव देखील घेण्याची इच्छा नाही. महाड विधानसभा मतदारसंघाचा भौगोलिक अभ्यास देखील या प्रतिस्पर्धी उमेदवाराला नाही त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील दोन मोठे नेते येणार तसेच पोलादपूर शहरातून दोन नगरसेवक पक्षात प्रवेश करणारा अशा पद्धतीच्या थापा गेल्या अनेक दिवसापासून प्रचारामध्ये वापरल्या जात आहेत. यामुळे मतदार जनतेमध्ये संभ्रम निर्माण होण्याऐवजी त्यांच्याच पक्षाचे महत्त्वाचे काही कार्यकर्ते येत्या काही दिवसात आमच्या शिवसेनेमध्ये आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करताना दिसतील असे विकासशेठ गोगावले यांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रसंगी पोलादपूर तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर तालुका संपर्कप्रमुख किशोर जाधव, पोलादपूर शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरसेवक सिद्धेश शेठ, विनायक दीक्षित तसेच अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.