Join WhatsApp Group
ताज्या घडामोडी

पेण पोलिसांची धडाकेबाज कामगीरी लोखंडी सी चॅनल चोरणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

४ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

     प्रतिनिधी  – किरण बांधणकर (पेण) पेण तालुक्यातील मौजे दुश्मी ठाकुरपाडा येथील खारपाडा ते दुश्मी रोडवर रामेश्वर कन्स्ट्रक्शन पेण यांनी काँक्रीट रोड बनविण्याचे काम ता.२४ जून रोजी सुरु केले होते. त्यांनी सदर कामाकरीता लागणारे एकुण ४० लोखंडी सी चॅनल साईटवर आणुन ठेवले होते. रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर केतन किशोर भोईर यांनी दिनांक २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता सदरचे लोखंडी सी चॅनल मोजुन ठेवले होते. त्यांचे काँकीट रोड बनविण्याचे काम ता.३०जुलै रोजी संपल्याने श्री. केतन भोईर यांनी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास साईटवरील लोखंडी सी चॅनल मोजले असता त्यामध्ये त्यांना ९ सी चॅनल कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदरचे सी चॅनल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असले बाबत केतन भोईर यांनी दि. ३१ जुलै रोजी पेण पोलीस स्टेशनमध्ये तकार दिल्याने त्याबाबत गुन्हा रजि. नं. २२१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

        सदर गुन्हयाचे घटनास्थळी असलेले सीसीटिव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर गुन्हयातील आरोपी करण दिलीप वाकोडे वय ३० वर्ष सध्या रा. रामवाडी, ता.पेण, जि. रायगड.  मुळ रा. भुसगणी, ता. जि. गुलबर्गा,  कर्नाटक व  राजेश रंजन चंद्रभुषण राय वय २४ वर्ष, सध्या रा. रामवाडी समर्थनगर, ता. पेण, जि. रायगड मुळ रा. राजौरा, पो. ठाणे ता. मुफसील, जि. बेगुसराई बिहार असे असुन त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाचे तपास अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांनी फिर्यादी केतन भोईर यांचे साईटवरुन चोरलेले लोखंडी सी चॅनल जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपीत यांनी चोरी करण्यासाठी वापरलेली टाटा एसीई टेम्पो कमांक एमएच ०४ एएफ ५३०२ हि देखील जप्त करण्यात आली आहे.

    सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे करुन गुन्हे प्रकटीकरण शाखा पेणचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहा. फौजदार राजेश पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र भोनकर, संतोष जाधव, सुशांत भोईर, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हसकोटी, पोलीस नाईक अमोल म्हात्रे व पोलीस शिपाई गोविंद तलवारे यांनी गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करुन ४,६३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये