माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रा. जि. प शाळा गोरेगाव व पहेल येथील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रतिनिधी - पाडुरंग माने - गोरेगांव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रा. जि. प. शाळा गोरेगांव व पहेल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आज दि. ३ ऑगष्ट रोजी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गोरेगाव येथील पदाधिकारी यांनी रा. जि. प. शाळा गोरेगांव आणि पहेल मराठी शाळा येथे शैक्षणिक साहित्याचे विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप कारण्यात आले तसेच आलेल्या मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले
यावेळी रायगड जिल्हा संघटिका डॉ. स्वीटी गिऱ्हासे, गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे, गोरेगाव उपशहरप्रमुख मनोहर कदम, पहेल सरपंच सौ. करिष्मा मांजरे, प्रसाद मांजरे, माजी उपसरपंच धोंडू कुंभार, बजरंग खराडे, सुनील खराडे, समीर केसरकर, मांजरवणे संपर्क प्रमुख सचिन खिडबीडे रोहित रातवडकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.