गडब येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून १६ लाख ५१ हजारावर धाडसी दरोडा
प्रतिनिधि - किरण बांधणकर ( पेण)

पेण तालुक्यातील गडब येथे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या एस बी आय बँकेच्या एटीएम मशीन कटरच्या साह्याने पडून एटीएम मध्ये असलेले १६ लाख ५१ हजार १०० रूपये धाडसी दरोडा टाकून लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे,
वडखळ पोलीस ठाण्यात या एटीएम दरोडयाचा गुन्हा गुरुवारी सकाळी नोंदवण्यात आला असून या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे डीवायएसपी शिवाजी फडतरे वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वडखळ पोलीस ठाणाच्या हद्दीत बुधवारी रात्री गडब गावातील एसबीआय बँकेच्या ए टी एम सेंटरचे लोखंडी शटर तोडून आतील एटीएम मशीन कटरच्या साह्याने फोडून १६ लाख ५१ हजार १०० रुपयांवर अज्ञात चोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे मात्र या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे गडबसह पेण तालुक्यात दरोड्याच्या घटनेने व्यापारी व नागरिकांमध्ये खळबळ माजली असुन याबाबत पेण एस बी आय बँकेचे मॅनेजर संजय प्रभाकर पाटील यांनी एटीएम दरोड्या बाबत फिर्याद दिली आहे .