Join WhatsApp Group
मनोरंजन

महायुतीची सत्ता माणगाव शहराचा कायापालट करणार- ॲड. राजीव साबळे

आ. गोगावले यांनी मंजूर केले ८१ कोटी २५ लाख तर खा. तटकरे मार्गी लावणार माणगांवच्या सांडपाण्याचा प्रश्न

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) दिल्ली आणि महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीची सत्ता आहे. त्याच धर्तीवर आता माणगाव शहरात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. गेली अडीच वर्षे शिवसेनेची सत्ता होती. या अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रतोद आणि एसटी महामंडळा अध्यक्ष आ. भरत गोगावले यांच्या माध्यमातून माणगाव नगरपंचायतीमध्ये ८१ कोटी २५ लाख रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने खा. सुनील तटकरे व महिला आणि बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणून तिन्ही पक्ष एकत्रित काम करून माणगाव शहराचा कायापालट करणार आहोत अशी ग्वाही शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माणगांव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीतील वचननाम्यामध्ये माणगांवकरांना अपेक्षित असलेली विकासकामे करण्यांत येतील असे आश्वासित करण्यात आलेले होते. त्यानुसार माणगाव शहराच्या विकासाकामांसाठी मागील अडीच वर्षामध्ये आ. भरत गोगावले तथा मुख्य प्रतोद उपनेते, शिवसेना विधिमंडळ पक्ष यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या मार्गदशर्नाखाली माणगाव नगरपंचायतीस महाराष्ट्र शासनाकडून अनुदान विविध योजनेतून सुमारे ८२ कोटी रुपये अनुदान मिळालेले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजना
१ कोटी ६० लाख रुपये रस्ते, गटार करणे, विशेष रस्ता अनुदान ३ कोटी ४० लाख मुख्य रस्ते करणे, नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजना, ४ कोटी रुपये रस्ते, परिसर विकास, विसर्जन घाट बांधणी करणे “नगरपरिषदांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना” ८० लाख रुपये

नाविण्यपुर्व कामांसाठी
नगरपरिषदांना वैशिष्टयपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान १४ कोटी ९८ लाख रुपये नगरपंचायत प्रशासकीय इमारत बांधकाम करणे, रस्ता अनुदान ४० लाख रुपये रस्ते विषयक कामे करणे, सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत १ कोटी रुपये सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविणे, १ कोटी ४० लाख रुपये सोलार व हाईमास्ट बसविणे, ५० लाख विविध विकास कामे करणे अशी एकूण २ कोटी ९० लाख रुपये, स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये उच्चतम कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहनात्मक बक्षिस निधी.

वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत
५ कोटी रुपये अनुदान बक्षीस म्हणून मंजूर झाले आहेत. त्यापैकी अडीच कोटी प्राप्त झाले आहेत. उर्वरित अडीच कोटी रुपये पुढील काळात मिळणार आहेत.आरोग्य विषयक कामांसाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अंतर्गत ४८ कोटी ,१७ लाख रुपये माणगांव पाणीपुरवठा राबविणे असे एकूण अनुदान ८१ कोटी २५ लाख रुपये आतापर्यंत निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून माणगाव नगरपंचायतीमध्ये जमा झाला आहे.

सुनील तटकरे यांच्या माध्यमातून माणगांव शहरात १०० कोटींची भुयारी सांडपाणी गटार योजना लवकरच मंजूर होणार आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. माणगांव शहरातील ११६ अनधिकृत ठरलेल्या इमारतींना संरक्षण देऊन त्या अधिकृत करण्यात येणार आहेत. माणगांव शहराचा विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. नगरपालिका इमारत बांधकाम प्रगती प्रथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल. ना. आदिती तटकरे यांच्या माध्यमातून नाट्यगृह बांधकामासाठी १५ कोटी निधी मंजूर करण्यात येणार आहे. पुररेषा नियंत्रण निकष लवकरच हटविण्यात येणार असून त्याबाबतचे पत्र शासनाने निर्देशित केलेले आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते ऍड. राजीव साबळे यांनी दिली.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये