माणगावचे गायक डॉ. सचिन चव्हाण यांना उत्कृष्ट गायक पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी - महेश शेलार ( माणगांव )

माणगाव – माणगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर सचिन चव्हाण यांना जयपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील गायन स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांना प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे सुपुत्र अमितकुमार, गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या या जागतिक वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत जगातील विविध देशांतील डॉक्टर असलेल्या गायकांनी सहभाग घेतला होता. कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करताना आपला भारत देश, महाराष्ट्र, कोकण, रायगड आणि माणगाव चे नाव प्रथम क्रमांक मिळवून उज्वल केले.
डॉ. सचिन चव्हाण यांना कॉलेज शिकताना गायनाची आवड निर्माण झाली होती. डॉक्टर पदवी घेतल्यानंतर माणगाव येथे स्थायिक झाल्यानंतर राजेंद्र पवार यांच्या हौशी गायक कलाकार वाद्यवृंदात सक्रिय सहभाग घेत असतात. त्यात ते आजही आपल्या गोड आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करतात. याच आवडीने त्यांना उत्कृष्ट गायक म्हणून गौरविण्यात आले.
डॉ. सचिन चव्हाण यांना उत्कृष्ट गायक म्हणून गौरविण्यात आल्यानंतर कोकण आणि माणगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स, प्रतिष्ठीत नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, वकील आणि त्यांच्या गायन क्षेत्रातील गायक मित्र यांनी सचिन चव्हाण यांचे अभिनंदन करीत आहेत.