दिनेश भाई खैरे यांच्या हस्ते व्याघ्रेश्वर मंदिरात महाअभिषेक सोहळा संपन्न

प्रतिनिधी – किरण बांधणकर (पेण) तालुक्यातील महाल मिऱ्या डोंगरावर ऐतिहासिक शिव मंदिर आहे. या शिवमंदिरात सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार निमित्त ग्रूप ग्रामपंचायत मिऱ्या डोंगर यांच्या वतीने महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता हा महाअभिषेक भाजप तालुका उपाध्यक्ष दिनेश खैरे दाम्पत्यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर ११ वाजता चांदेपट्टी ग्रामस्थांकडून भजन करण्यात आले दरम्यान मान्यवरांचे स्वागत देखील करण्यात आले शिवाय दुपारी २ वाजता असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांनी देखील शिव मंदिरात येवून अभिषेक केला
यावेळी निलिमाताई पाटील माजी अध्यक्ष रा.जि.प., दिनेश भाई खैरे उपाध्यक्ष पेण तालुका भाजप, वृषाली खैरे माजी सरपंच म.मि.डोंगर, जनार्दन लांगी अध्यक्ष व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, नरेश शिंदे उपाध्यक्ष व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, संतोष वाघमारे अध्यक्ष पाबळ गण पंचायत समिती, सोनल उघडे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत म. मि.डोंगर, रमेश भस्मा, राजू आखाडे, भाई खैरे, हरी भस्मा, जयराम ठाकरे, लक्ष्मण शिद, विठ्ठल जेधे, ज्ञानेश्वर दळवी, मधुकर भिकावले, जनार्दन पवार पोलीस पाटील, संतोष मांढरे, अशोक पिंगळा, सोमा शिद, महादू खाकर, बाळू उघडा, रामा खाकर उपस्थित होते.