वडवली येथील ग्रामस्थांचा शिवसेना उ. बा. ठा गटात जाहीर प्रवेश
प्रतिनिधी - - पांडुरंग माने ( गोरेगांव )

गोरेगाव – वडवली येथील शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) गटाला खिंडार पडले असून वडवली मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी शिवसेना उ. बा. ठी गटात प्रवेश केला आहे. शिवसेना उ. बा. ठा गटाचे शाखा प्रमुख हुसेन लस्करी यांनी वडवली येथील शिंदे गट तथा भरतशेठ गोगावले यांचे खंदे कार्यकर्ते आणि मांजरोणे गणाचे विभाग प्रमुख शरिफ हर्गे यांच्या नेतृत्वाला तडा देत हा करिष्मा करुन दाखवत शिवसेना शिंदे गटाचे पुरुष व महिला कार्यकर्ते यांचा स्नेहलदीदीॉ कामत- जगताप यांच्या प्रमुख उपस्थित पक्षात प्रवेश करून घेतला आहे.
यावेळी बोलताना, उ. बा. ठा गटाचे वडवली शहर प्रमुश हुसेन लष्करी यांनी शिंदे गटाला डिवचत म्हणाले की, ये तो आज का ट्रेलर है, आनेवाली ५ तारीख का पिक्चर बाकी है, गद्दारोंको सबक हम सिखाके रहेंगे. पुढे स्नेहलदीदी जगताप यांनी बोलताना गद्दारांना हया निवडणुकीत पराभवाची धूळ नक्की चाखणार, गद्दारांना थारा देवू नका.. आपला विजय नक्की आहे.
दरम्यान वडवली येथील स्नेहल जगताप कामत यांच्या हस्ते मखदुमा डावरे, फौजिया डावरे, अल्मास डावरे, नफीसा डावरे, शमीम धनसे, नसरीन बुले, नजमुननिसा पाळेकर, अमन धनसे, इब्राहिम डावरे, युनूस हरगे, इब्राहिम धनसे, जहूर लोखंडे, मोहसीन पालेकर मेहरान पालेकर, इस्माईल बुले,करीम भाई डावरे, अजीम डावरे, निहाल हरगे, अस्लम लोखंडे, जमीर फकी, दानिश फकी,शोएब फकी, शेख अहमद डावरे आणि हनीफ भाई बुले यांनी शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेत जाहीर प्रवेश केला यावेळी स्नेहल जगताप, माणगांव तालुका प्रमुख गजानन अधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ व महिला हजर होते.