Join WhatsApp Group
ताज्या घडामोडी

किसान कृषी प्रदर्शनाला पंकज तांबे यांची भेट ; भात शेती लागवड यंत्राची घेतली माहिती

प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे/माणगाव )

माणगाव – पुणे येथील मोशी या ठिकाणी देशातील शेतकऱ्यांसाठी किसान कृषी प्रदर्शन शासनाच्या वतीने आयोजित केले जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. या कृषी प्रदर्शनला माणगांव तालुका स्वराज्य संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष पंकज तांबे यांनी ११ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे पुणे येथील मोशी या ठिकाणी भेट दिली. या प्रदर्शनादरम्यान भात शेती लागवडी करिता लागणाऱ्या यंत्राची त्यांनी माहिती करुन घेतली.  यावेळी पंकज तांबे यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिर्के, संभाजीदादा गायकवाड उपस्थित होते.

भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. संपूर्ण देशातून कृषी प्रदर्शन मेळाव्याला भेट देण्यासाठी शेतकरी येत असतात. पंकज तांबे हे शेतकरी मित्र म्हणून तालुक्यात त्यांचा परिचय आहे. शेतकऱ्यांना नेहमी त्यांचा मदतीचा हात असतो. या कृषी प्रदर्शनात आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची यासाठी विविध अवजारे उपलब्ध होती. या अवजारांची संपूर्ण माहिती पंकज तांबे यांनी घेतली आहे. जेणेंकरुन माणगांव विभागातील शेतकऱ्यांना याची माहिती देई शकतील. त्यामुळे ते दरवर्षी कृषी प्रदर्शन मेळाव्याला आवर्जून भेट देत असतात.

कोकणातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून त्याच्या सोबत विविध प्रकारच्या भाजीपाला हा सुद्धा व्यवसाय शेतीला जोड धंदा म्हणून येथील शेतकरी करीत आहेत. या कृषी प्रदर्शनात आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची यासाठी नवीन यंत्र उपलब्ध असतात. या करिता देशातील शेतकरी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी  व नवीन तंत्रज्ञान, अवजारांची माहिती करुन घेण्यासाठी मोठया संख्याने या पाच दिवसात येत असतात.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये