जागर नवदुर्गेचा.. सन्मान स्त्री शक्तीचा
रुक्मीणीबाई महाडिक या माऊलीचा शिवसेना युवासेना तर्फे सन्मान.

प्रतिनिधी – नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे ) नवरात्रोत्सव च्या दुसऱ्या दिवशी नवदुर्गा म्हणुण समाजिक कार्य केलेल्या त्या माऊलीचा सन्मान शिवसेनेच्या युवासेना तर्फे करण्यात आला.
गं.भा. रुक्मिणीबाई यशवंत महाडिक भातशेती हा व्यवसाय करत असता समाजसेवा म्हणून पुर्वी जेव्हा आपल्या भागात डॉक्टरांची संख्या कमी होती तेव्हा गर्भवती महिलेला वेदना चालू झाल्या की मोठा प्रश्न निर्माण व्हायचा तेव्हा या रुक्मिणीबाई आपल्या अनुभवानुसार गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी विनामूल्य मदत करायच्या. समाजासाठी अडी अडचणीला धावत जाण्याचा हा त्यांचा स्वभाव आहे. गावात कुणावर ही संकट आले, तरी दुसऱ्यासाठी हसत मुखाने सामोरे जावुन निराकरण करुन धिर देण्याचे काम त्या करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन श्रीवर्धन व म्हसळा तालुका क्षेत्रसंघटक तथा म्हसळा तालुका गवळी समाज उन्नती संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड, शिवसेनेच्या युवासेनेचे तालुका अधिकारी कौस्तुभजी करडे, तालुका प्रमुख सुरेशजी कुडेकर, अंकुश नटे, शिवसेना संघटक समीरजी लांजेकर, रविप्रभा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष नरेशजी विचारे, समाजाचे जेष्ठ समाजसेवक शांताराम घोले, महादेव महाडीक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला