शिवसेनेचा ४ ऑगस्टपासून भगवा सप्ताह सदस्य नोंदणीच्या फॉर्मचे वाटप.
प्रतिनिधी - ओमकार नागावकर (अलिबाग)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात ४ ते ११ ऑगस्ट २०२४ या दरम्यान हा सप्ताह साजरा होणार आहे.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख विष्णू पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विधानसभा संपर्क प्रमुख अजय गोयजी, जिल्हा सल्लागार सतिश पाटील, युवासेना जिल्हा अधिकारी अमिर (पिंट्या) ठाकूर, तालुका प्रमुख शंकर गुरव, विधानसभा उपजिल्हा संघटक अजित पाटील, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, विधानसभा तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, धनंजय गुरव, उपकार खोत, विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर आदी उपस्थित होते.
भगव्या सप्ताहच्या नियोजनासंदर्भात जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी अलिबाग तालुक्यातील शहरप्रमुख संदिप पालकर यांचे जनार्दन हॉलिडे होम येथे दि.३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन विरोधकांचे भुई सपाट करायचे आहे. लोकसभेत संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने बाजी मारली हाच विजयाचा डंका विधानसभेत दिसला पाहिजे. विरोधकांना विजयाची पेटती मशाल दाखवायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे. याकरीता विभाग प्रमुख, शहर प्रमुखांना तसेच शिवसेना कार्यकर्त्यांना फॉर्मचे वाटप करण्यात आले.