श्री. अरविंद सिताराम उभारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
वाढदिवसानिमित्त अंबर्ले येथे वृक्षारोपण तसेच वह्या वाटप

प्रतिनिधी – रिजवान मुकादम (पुरार)
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक, शिवसेना पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा आमदार भरतशेठ गोगावले यांचे कट्टर खंदे समर्थक सिताराम शेठ उभारे यांचे सुपुत्र उद्योजक श्री. अरविंद सिताराम उभारे यांचा ३५ वा वाढदिवस सोमवारी उत्साहात अंबर्ले येथे सिताराम उभारे मित्र परिवाराकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
सकाळी अंबर्ले येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्यानंतर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबर्ले येथे विध्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले, वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवत असल्याने एकच दिवसात सर्व कार्यक्रम शक्य नसल्याने परिसरातील रायगड जिल्हापरिषद प्राथमिक शाळा लोणेरे, लाखपाले, उसरघर, नवघर, रेपोली, न्हावे, (आदिवासी वाडी) कातलाचा कोंड, देवळी, मूर, भिंताड, नागांव, पन्हळघर खुर्द, पहेल, पन्हळघर बुद्रुक शाळेत देखील वाढदिवसानिमितत वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे सिताराम उभारे यांनी यावेळी सांगितले.
पुढे कार्यक्रमात व्यक्त होताना त्यांनी त्यांच्या पडत्याकाळात ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत त्यांचे ऋण व्यक्त करत म्हणाले कि आज मी उद्योगपती आहे मात्र एके काळी माझी परिस्थिती नसल्याने माझ्या मुलांना शिक्षणासाठी दहावी मध्ये प्रवेश घेणे शक्य नव्हते मात्र त्यावेळी पत्रकार स्वर्गीय प्रवीण गोरेगांवकर यांनी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली आज ते नाहीत पण त्याची उणीव मात्र जाणवते तसेच पालकर गुरुजी यांनी ना. म जोशी विद्यालयात दाखला मिळवून दिला व कृष्णा चायवाले यांनी देखील मदत केली, यांच्या अमूल्य सहकार्यामुळे माझ्या मुलांना दहावी चे शिक्षण देणे शक्य झाले व पुढे शिक्षणात टॉप करत मुलाने एम.बी.ए डिग्री प्राप्त केली.
या नंतर सायंकाळी ५ वाजता च्या सुमारास दुर्गादेवी सभा मंडपात वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थिती मुळे सर्वांचा उत्साह वाढला होता, आमदार गोगावले यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन अरविंद सिताराम उभारे यांना वाढदिवनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हापरिषद सदस्य, माणगांव नगराध्यक्ष, माजी माणगांव तालुका सभापती, उपसभापती, सरपंच – उपसरपंच, शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच कुणबी समाजाचे उद्योजक, कुणबी युवा मंचाचे सदस्य व इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर नागरिक व ग्रामस्थांकडून श्री. अरविंद सिताराम उभारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.