
पेण – महिला व मुली यांच्यावरील वाढत्या अत्याचाराची घटना दखल घेऊन, पेण पोलीस ठाण्याकडे दामिनी पथकाची पुर्नरस्थापना करण्यात आली आहे. या आगोदर पेण पोलीस स्टेशनला दामिनी पथक होते. परंतु ते अधिक पणे सक्रिय करण्यासाठी पेण पोलीस ठाण्याचे कार्यरत असलेली चार महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये मपोना/२४१ शिंदे, मपोह/११३ पालवे, मपोहवा/१९४ धनावडे, मपोह/७४ पाटील, यांची नियुक्ती करण्यात आली असुन, त्यांना पेट्रोलिंगकरीता अद्यावत नविन मोटार सायकल व एमडीटी (११२) सेवा पुरविण्यात आली आहे.
डायल ११२ ही सेवा तात्काळ मदत पुरविण्यासाठी कटिबध्द आहे. सदर दामिनी पथक पोलीस अंमलदार हे खालील परिसरात नियमित गस्त घालणार आहेत.
१) पेण बस स्थानक,
२) सार्वजनिक विद्यामंदीर
३) प्रायव्हेट हायस्कुल
४) गुरुकुल शाळा
५) केईएस शाळा
६) कारमेल हायस्कुल
७) पतंगराव कदम हायस्कुल
८) आयटीआय कॉलेज रामवाडी
९) कंवडाळ तळा
१०) ठाकुर क्लासेस, चिंचपाडा
११) आर्या क्लासेस चावडीनाका
१२) ग्रिन पार्क
१३) महिलाआश्रम महाडीकवाडी
१४) विरेश्वर घाट, विसर्जन ठिकाण
१५) कुंभार तलाव
१६) गणपती विसर्जन ठिकाण
१५) भुंडा पुल
१६) मोतीराम तलाव
तरी पेण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व महिला भगिनी व मुलींना यांना आव्हान करण्यात येते की आपणांस पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचार गुन्हयाच्या अनुषंगाने काही मदत भासल्यास डायल ११२ यावर कॉल करुन तात्काळ मदत प्राप्त करुन घ्यावी.