आदिवासी बांधवाचा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी - पांडुरंग माने ( गोरेगांव )

गोरेगाव – दि.९ ऑगस्ट २०२४ थरमरी आदिवासी वाडी ग्रा.पं.शिरवली तर्फे निजामपुर ता.माणगांव जि.रायगड. कला, भाषा, वेशभुषा अशा वैविध्यपूर्ण जीवनशैलीतून आपला सांस्कृतीक वारसा जपणाऱ्या तसेच वर्षानुवर्षे जल – जंगल – जमीन संवर्धनात सदैव गुंतून राहिलेले निसर्गाचे खरे सेवक असणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवाचा जागतिक आदिवासी दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.
एक महिन्यापूर्वी गवंढी काम प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून वाडीतील तरुण स्वदेस फाउंडेशन च्या विचारात जोड़ले गेले होते मात्र वाडी मध्ये स्वछता, गांव एक संघता व शैक्षणिक दर्जा यात उदासीनता होती त्यामुळे या प्रशिक्षणा दरम्यान स्वच्छतेचे महत्व पटवून देत वाडी स्वच्छ करण्यात आली. गावातील समाज हॉलला रंगरंगोटी, दरवाजा, लाईट फिटिंग तसेच सर्व स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आल्या. सोबतच रात्रीच्या वेळेत सर्व मुलांकडून अभ्यास करुन घेण्यासाठी गावातील दोन मुलींना तयार करुन सामाजिक सभागृहामध्ये फॅन तसेच शैक्षणिक साहित्य देत नियमितपणे वर्ग सुरु करण्यात आले. गावातील या बदलामुळे सर्व सदस्य गाव समिती या उपक्रमात सहभाग घेण्यास सुरुवात झाली. यानंतर गांव समिती व गावकी मधे महत्वांचे काही निर्णय घेतले गेले, परिणामी वाडी मध्ये यंदा पहिल्यांदाज आदिवासी दिन साजरा करण्यात आला त्याच बरोबर मुलांचे संस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले.
आज कार्यक्रमानंतर स्वदेस फाउंडेशन एक विचार व राजेंद्र बेंद्रे यानी आम्हाला प्रेरणा व मार्गदर्शन दिले त्यामुळे आमची वाडी आज बदलतेय असे मत समिति सदस्य व इतर ग्रामस्थांनी बोलून दाखविले. तसेच गांवातील या बदलाकरिता प्रदीप सर यांचे मार्गदर्शन, मेघना मॅडम व भीमराव सर यांची मोलाची साथ तसेच लर्न नेटचे ट्रेनर प्रेमजी मेघवाल आणि शिरवली ग्राम पंचायतचे सरपंच मा. सदानंद पाणसरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.