छोटमशेठच्या जाचाला कंटाळून भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
कुर्डुस ग्रामपंचायतमध्ये उरली सुरली शेकाप आता संपृष्टात येण्याच्या मार्गावर!

एवढ्या वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिलित त्यांनीच तुमचा विकास रोखला – आमदार महेंद्रशेठ दळवी
किरण बांधणकर ( पेण ) अलिबाग मुरुड रोहा मतदार संघातील कुर्डूस ग्रामपंचायत मधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील (सोन्या) व शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य समिता संदीप सुतार व नवतरूण मित्र मंडळ मुंबई नवखार आणि ग्रामस्थ नवखार यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी मानसीताई दळवी, आदिती दळवी व संपर्क नेत्या संजीवनीताई नाईक, तुषार शेरमकर आदी उपस्थित होते
भाजपचे छोटमशेठ यांच्या जाचाला कंटाळून तसेच शेकापचे जयंत पाटील यांनी गावाच्या विकासकामाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आम्ही दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील, तुषार शेरमकर तसेच नवखार मुंबई मंडळाचे प्रवीण ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
एवढ्या वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिलित त्यांनीच तुमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत विकास रोखला पण आता तुम्ही एकत्र येऊन शिवसेनेत एकजुटीने पक्ष प्रवेश केलात तुमच्या समस्या तसेच गावाचा विकास यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले तर मानसीताई दळवी यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर व विकासकामांच्या जोरावर इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत आज आमदार दळवी यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द नक्की पूर्ण केला जाईल असा विश्वास बोलून दाखवला.
तसेच जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आज कुर्डूस ग्रामपंचायत मधील नवखार, बिरवागळे, सांबरी ग्रामस्थांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला या पक्ष प्रवेशाला तडा जावू दिला जाणार नाही ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यात येतील.
भाजपमधुन आलेले प्रथमेश पाटील (सोन्या) यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली परंतू छोटम शेठ सारख्या लोकांच्या जाचाला कंटाळून आज भाजप कार्यकर्त्ये शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळुन दुखावलेले कार्यकर्त्ये दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत असे सांगत कुर्डुस ग्रामपंचायत मध्ये असलेली उरली सुरली शेकाप लवकरच संपृष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले.
यावेळी उमेश राजेंद्र पाटील संतोष बळीराम ठाकूर रुपेश मच्छिंद्र ठाकूर, धीरज बैकर, समीर ठाकूर, अनिकेत ठाकूर, स्वामी ठाकूर, अक्षय ठाकूर, किरण ठाकूर, जालिंदरनाथ ठाकूर, सोनेरी ठाकूर, प्रवीण ठाकूर, श्रीधर ठाकूर, मारुती ठाकूर, दीपक पाटील, धनाजी पाटील, चंद्रमोहन पाटील, गणेश ठाकूर, चेतन ठाकूर, हरीश पाटील अनिकेत पिंगळे, विराज पाटील, गोपीनाथ म्हात्रे, राम ठाकूर, संदीप कर, सोजल पाटील, मंगेश पाटील, सुनील ठाकूर, अभय ठाकूर सचिन ठाकूर अलंकार ठाकूर मंगेश पाटील आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला