Join WhatsApp Group
आरोग्य व शिक्षण

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण यांच्या उपस्थितीत स्कूल बस प्रथम सुरक्षा समिती सभा संपन्न.

प्रतिनिधी - सचिन पवार (माणगांव)

माणगांव – रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात दि. २४ ऑगस्ट रोजी सुधाकर नारायण शिपुरकर स्कूलमध्ये पेण उप प्रादेशिक परिवहन यांच्य वतीने प्रथम सुरक्षा समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माणगांव तालुक्यातील सर्व शालेय स्कुल बसेसचे चालक – मालक शालेय कमिटी मेंबर मुख्याध्यापक शालेय बस व्यवस्थापक या सभेला उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस शिपुरकर स्कूलच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधाकर नारायण शिपुरकर इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सन २०२४-२५ करिता स्कुल बस प्रथम सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासन परिपत्रक एम व्ही आर ८०८/प्र. क्र. १५३/परी दि. ३० एप्रिल २०११ च्या परिपत्रक नियम क्र. ५ (२) मधील तरतूदनुसार शालेय मुलाची ने आण सुरक्षितपणे करणे याकरिता आपल्या शाळेमध्ये परिवहन समिती गठीत करण्यात आली. यावेळी पेण उप प्रादेशिक परिवहनचे मा. श्री. रवींद्र गावंडे साहेब यांनी बस चालक मालक तसेच संस्थेतर्फे स्कूल बसने मुलाची ने आण करण्याकरिता सुरक्षितता असावी असे सांगितलं तसेच प्रत्येक मुलाचे स्टॉप त्याचा पत्ता मोबाईल नं. त्याचा रक्त गट अशी माहिती अद्ययावत असणे गरजेचं आहे असे स्पष्ट केले त्याच प्रमाणे बसमध्ये अग्निशमन सिलेंडर, आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी येणारे प्रथमोपचार साहित्य असणे आवश्यक आहे आणि सदर परिपत्रकातील २८ मुद्याचे तंतोतंत पालन करून बसमध्ये सुधारणा करण्यात याव्या अशा सुचना श्री. रवींद्र गावंडे साहेब यांनी दिल्या.

पुढे माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे साहेब व माणगांव वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सुद्धा सर्व स्कूल बस चालक मालक तसेच शाळेय मुख्याध्यापिका शालेय व्यवस्थापक, शिक्षक पालक प्रतिनिधी, स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांना मौलाचे मार्गदर्शन दिले तसेच बसची आवश्यक कागदपत्रे वैद्य असणे आवश्यक आहेत. स्कूल बस चालक यांच्याजवळ त्याचा लायसन्स बॅच असणे गरजेचे आहे तसेच बसमध्ये महिला मदतनिस निश्चित असणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आहे. शिवाय बसचा चालक हा अग्रेसीव्ह नसावा तो प्रामाणिक असावा बसमध्ये आसन क्षमता जास्त असेलेल्या बसमध्ये अटेंडन्स असणे आवश्यक आहे. शाळेतील शारीरिक शिक्षण विषयांचे शिक्षकामार्फत दिलेल्या रस्ता सुरक्षा पाठशाळा सूचनापत्र सर्व विदयार्थ्यांना वाचून व समजावून सांगावे आणि सूचनापत्रक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात याव्या. सदर समितीत नियुक्त शिक्षक पालक संघातील सद्यास्थ्यांची सुद्धा सदर नियमाबाबत पालकांची जागृती करणे व अडचणीवेळी शाळा व पालक याच्याशी संवाद साधून नियमाची पालन होईल याकडे लक्ष देण्यात यावे असे सूचित करण्यात असून दर सहा महिन्यात सदर समितीचे सभा घेऊन आढावा घेण्यात यावा असं सांगण्यात आले.

यावेळी या समिती बैठकमध्ये शिपुरकर स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा मोरे मॅडम, गगुबाई संभाजी शिंदे cbsc स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. निशिगंधा मयेकर मॅडम, निकम स्कूलच्या सौ. कोकाटे मॅडम, माणगांव स्कूल बसचे युनियन अध्यक्ष, कार्याध्यक्ष श्री.सचिन पवार, शबीर अखवारे उपाध्यक्ष रंजीत बुटे, सेक्रेटरी मुबाशीर जिलानी व माणगांव तालुक्यातील सर्व शालेय व्यवस्थापक चालक मालक व पालकवर्ग व अन्य मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये