
तळा – मा. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार मा.तहसीलदार साहेबा यांचे मार्गदर्शनाखाली तळा नगरपंचायत कार्यालयात २९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियान शिबिर संपन्न झाले.
मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी जिल्ह्यातील आदिवासीवाडीतील आदिवासी बांधवांना पाड्यावर जाऊन जनजाती दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, पी एम् किसान मतदान कार्ड योजनेचा लाभ देण्याचा आदेश दिले असून तालुक्यातील १६ आदिवासी पाड्यावर तारखे निहाय शिबीर घेण्यात येणार आहेत.
मा. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार मा.तहसीलदार साहेबा यांचे मार्गदर्शनाखाली तळा नगरपंचायत कार्यालयात २९ ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अंबेळी आदिवासी वाडीतील बांधवांनी लाभ घेतला असुन जातीचे दाखले, आधारकार्ड अपडेट, मतदानकार्ड, रेशनकार्ड या करिता मदत करित योजनेचा लाभ देण्यात आला. याकरिकता किशोर मालुसरे मंडळ अधिकारी, वाघमारे तलाठी, मदतनीस अडखळे, नगरपंचायत कक्ष अधीक्षक संदीप भांगडे, लिपिक दिपक वडके, महा ई सेवा संचालिका वैश्णवी दलाल यांनी उत्तम सहकार्य केले.