Join WhatsApp Group
आरोग्य व शिक्षण

आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून रा. जि. प. शाळा नागांव येथील विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप

CCTV आणि संगणक प्रणाली देखील लवकरच भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून बसवणार

गोरेगांव – आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आणि शिवसेना कार्यकर्ते नागांव यांच्या सहकार्यातून नागांव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बॅगेचे वाटप करण्यात आले.

कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले हे नेहमीच सर्वांना मदतीचा हात देतांना दिसत असतात. त्यांच्याकडे गेलेला एकही माणूस रिकाम्या हाताने कधीही परत येत नाही म्हणूनच भरतशेठ यांना गरीबांचा शेठ म्हणून ओळखले जाते. यावेळी देखील आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आणि शिवसैनिकांच्या सहकार्यातुन नागांव रा. जि. प. शाळेतील ३४ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतिच्या स्कुल बॅगचे वाटप आज सकाळी ११.०० वाजता करण्यात आले.

या वाटपाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थांसोबत लहान मुलांवरील वाढत्या अत्याचारांचे गुन्हे तसेच शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणखी काय उपायोजना करावी याबाबत चर्चा केली असता नागांव शाळेत CCTV तसेच संगणक प्रणालीची कमतरता असून आम्ही लवकरच भरतशेठ यांच्या माध्यमातून शाळेतील आमच्या मुलांच्या हिताची गरज देखील लवकरच पुर्ण करु असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

यावेळी महिला उपतालुका प्रमुख स्वाती करकरे, शाखा प्रमुख भुपेंद्र कासरेकर, शिक्षण समिती अध्यक्ष किरण ढेपे, माजी उपसरपंच राजेंद्र शिर्के, हरेश शिर्के, रमेश मोरे, ग्रा. सदस्य निवेश शिर्के, सिद्धि जाधव मुख्याध्यापिका आरती जाधव तसेच इतर शिक्षक व पालक श्रीकांत हाटे, निलेश महादे  उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये