मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनं मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी
प्रतिनिधी - रिजवान मुकादम ( पुरार)

पुरार – मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था आणि रखडलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी काल दि. २६ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली १७ वर्षापासून सुरू आहे मात्र हे काम मंद गतीने सुरू असून काम पूर्ण होणे हे कोकणवासीयांचे एक स्वप्नच बनून राहिले आहे. प्रत्येक वर्षी गणपतीच्या तोंडावर ठेकेदारांकडून भले मोठे खड्डे माती दगड व काही ठिकाणी पेवर ब्लॉक लावून मलमपट्टी केली जाते. सरकार व ठेकेदारांकडून गणपती सण व पावसाळ्यानंतर महामार्गाचा काम जलद गतीने पूर्ण करण्यात येईल अशी आश्वासनेच दिले जातात परंतु सण उत्सव झाले की मात्र आश्वासनाचं सर्वच राजकारण्याना विसर पडतो.
गेल्या सतरा वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गावर झालेल्या अनेक अपघातामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत तर हजारो लोकांना आयुष्यभराचे अपंगत्व स्वीकारावे लागले आहे. त्यामुळे कोकणातील जनतेमध्ये खूपच आक्रोश व संताप निर्माण झाला आहे. नुकताच मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने माणगाव येथे आमरण उपोषण देखील करण्यात आले होते त्यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी उपोषण कर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत व्हिडिओ कॉल द्वारे संभाषण करून दिले होते
दरम्यान १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुख्यमंत्र्यासह मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते परंतु १९ ऑगस्ट रोजीची मिटींग काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.
आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिलेल्या शब्दानुसार पाठपुरावा घेतला त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज २६ ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर स्वतः निघाले,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यासह मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास करत पळस्पे कासू नागोठणे कोलाड इंदापूर माणगाव व लोणेरे येथे महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेची पाहणी केली. लोणेरे येथे संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गाच्या संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना गणपती सणासाठी लाखोच्या संख्येने कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना महामार्गावरून त्रास होवु नये याकरिता रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे तसेच गणपती सणानंतर लवकरात लवकर महामार्गाचे काम पूर्ण करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.
लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार ठेकेदारांना तुरुंगात टाकण्यात येईल – मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे
मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान लोणेरे येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि ठेकेदारांना कामाचे पैसे मिळतात ते फुकट काम करत नाही, कोणाचीही गई केली जाणार नाही, रस्त्याच्या कामात दिरंगाई करत असल्याने अनेक लोकांचे अपघातात मृत्यू होत आहेत, जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना जेल मध्ये टाकण्यात येईल तसे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.