कोकणवासीयांना खड्ड्यातून प्रवास करायला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गनिमी कावा करीत शिवसैनिकांनी दाखविले काळे झेंडे
प्रतिनिधी - दीपक लोके (पेण)

पेण – तब्बल १७ वर्ष कोकणवासीयांना व चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यातून प्रवास करायला लावणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आज पेण तालुक्यातील वाशी नाका येथे मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करण्याकरिता आलेल्या मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा महामार्गावर तैनात करण्यात होता परंतु मुंबई गोवा महामार्गावर असलेले पेण तरणखोप येथील बिरोबा हॉटेल येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध प्रदर्शनाकर्त्यांना जमले होते परंतु महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले.
गनिमीकाव्याने दाखवले काळे झेंडे
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे गनिमी काव्याची आखणी करून शिवसैनिकांची दुसरी टीम तयार केली व गनिमी कावा करीत वाशी नाक्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत घोषणा देत निषेध नोंदविला.
जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हाध्यक्ष यांना घेतले ताब्यात
मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे मागील सोळा वर्षात अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे. मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल सात वेळा या महामार्गाची मॅरेथॉन पाहणी केली होती परंतु हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा या महामार्गाची अवस्था बिकट असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला असल्याने पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हाध्यक्ष तसेच शिवसैनिकांना ताब्यात घेतले.