Join WhatsApp Group
सामाजिक

हद्दपार होत चाललेल्या स्थानिक माणसाला उभे करण्यासाठी उच्च शिक्षीत युवकानी पुढे येवून काम करण्याची गरज. – माजी आ. जयंत पाटील

प्रतिनिधी - दिपक लोके ( पेण )

 पेण – मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणुस हा येथील मुळ रहिवासी माञ बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मुळ माणुस मुंबईमधुन हद्दपार झाला आहे. मुंबई म्हणता.. म्हणता.. आज नवी मुंबई ही तिसरी मुंबई येवु घातलेली आहे त्या नव्या बदलात आज येथील जमीनी घेतल्या जात असून येथील स्थानिक आगरी कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे या आगरी कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दुरदृष्टी असलेल्या उच्च शिक्षित तरूणांनी पुढे येवून समाजात काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. जयंत पाटील यानी केले.

       माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त अतुल नंदकुमार म्हाञे प्रतिष्ठान यांच्यावतीने पेण येथील आगरी समाज हॉल येथे ए. टी पाटील जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. जयंत पाटील बोलत होते.  जयंत पाटील म्हणाले की, गेली ४० वर्षे राज्याच्या विधीमंडळात गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी आपण कायदे करीत आहोत. आज काळाच्या ओघात हा वर्ग संकटात सापडला आहे. या वर्गाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा माणसांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी ए.टी. पाटील यांनी अव्याहतपणे काम केले ते काम पुढे नेण्यासाठी समाजातील तरूण उच्च शिक्षित वर्गाने पुढे येवुन काम करण्याची गरज आहे. अतुल म्हाञे सारखा व्यापक दुरदृष्टी असलेला तरूण आज हे काम करत आहे ही सामाधानाची बाब आहे. नवी दृष्टी असलेले असे तरूणच या समाजाला नवी दिशा देवू शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

          तसेच सुर्यकांत पाटील यांनी ए. टी. पाटील यांच्या अनेक पैलूवर प्रकाश टाकला तर डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी आपल्या वडीलांच्या विचाराची थोरवी विषद करताना अनेक आठवणींना उजाला दिला. कार्यक्रमाच्या शेवटी अतुल म्हात्रे यांनी ए. टी. पाटील यांचे समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगुन आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले. आज येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांची कायमची सोडवणूक करून येथील शेतकरी संपन्न कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्रीत येवून काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, डॉ. सिद्धार्थ पाटील शेकापचे माजी नगरसेवक अजित सालुंके,  प्रकाश शिगरूत, पेण पं.स.चे माजी सभापती महादेव दिवेकर चंद्रकात पाटील कॉंग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, सुर्यकात पाटील अड. रोशन पाटील आदी  मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये