यशश्री शिंदे कृर हत्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हसळा संघटनेच्या वतीने जाहिर निषेध
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर (म्हसळा)

म्हसळा: उरण येथील यशश्री शिंदे हिची हत्या करून तिच्या देहाची विटंबना करून कृरकर्मा आरोपी दाऊद शेख फरार झाला होता, यामुळे उरण सह संपूर्ण रायगडमध्ये संतापाची लाट उसळुन लवकरात लवकर कृरकर्मा आरोपी दाऊद शेखला अटक करण्याची मागणी होत असताना म्हसळा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हसळा तालुका संघटनेच्या वतीने म्हसळा पोलीस ठाण्यात पो. उ. नि. डि. व्ही. एडवळे, पो. उ. नि. उदय धुमस्कर यांच्या कडे निषेधार्थ पत्रक देण्यात आले व लवकरात लवकर या राक्षसी प्रवृत्तीच्या कृरकर्मा आरोपी दाऊद शेखला अटक करून त्याला भर चौकात मरेपर्यंत फाशी देण्यात यावी अशी संघटनेच्या वतीने संतापजनक मागणी होत आहे. तसेच रायगड मध्ये अनेक ठिकाणी निषेधार्थ मोर्चे देखील काढण्यात आले. कृरकर्मा दाऊद शेखला जनतेच्या हवाली करा अशी रायगडमधील जनतेची पोलीस प्रशासनाकडे आक्रोश जनक मागणी होत आहे.
यावेळी म्हसळा पोलीस ठाण्यात निषेधार्थ पत्रक देतांना श्रीवर्धन मतदार संघ क्षेत्र संघटक व माजी सभापती रविंद्र लाड, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, युवा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, उप तालुका प्रमुख राजाराम निलटकर, संघटक बाळकृष्ण म्हात्रे, उप शहर प्रमुख दिपल शिर्के, विभाग प्रमुख गोपी सावंत, विभाग प्रमुख गणु बारे, उप विभाग प्रमुख नारायण नाक्ती उपस्थित होते.