Join WhatsApp Group
मनोरंजन

कपाळावर आठ्या पडणा-यां काकांनी खासदारकीच्या कालावधीचा मोजमाप करु नये; खासदार धैर्यशिल पाटील यांचे शेकापचे मा. आ. जयंत पाटील यांना प्रत्युत्तर…

कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात राजकीय शरसंधान चिमटे अन कोपरखळ्यांनी आणली रंगत...

प्रतिनिधी – किरण बांधणकर ( पेण ) भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील व केंद्रातील नेतृत्वाने मला पक्षात सामावून घेत मला खासदारकी बहाल केली मात्र या पक्षनिवडीचे राजकारण कुणाला पचले कुणाला नाही असो हा ज्याचा त्याचा स्वभावधर्म असतो. माझे समर्थक कार्यकर्ते आनंदले पण काही काकांच्या कपाळावर आठ्या पडून सतरा महिन्याचा कालावधी यात काय काम करेल. ज्या काकाना शेकापच्या जिल्हा परिषदेत २४ जागा निवडून आल्या होत्या आणि १२ जागा आलेल्या पक्षाला अध्यक्षपद दिले हा राजकीय हिशोब या काकांना कळला नाही. माझ्याबाबत ते म्हणतात यातील सहा महीने आचार संहीतेत जातील तर सहा महिने संसद भवन सभागृहातील कामकाज समजायला लागतील उरलेल्या पाच महिन्यात काय काम होईल असे ते काळजीने बोलतात. काका आता माझी काळजी करण्याचे कारण नाही कारण दुसरे काका माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असुन त्यांनी मला या पदावर नेण्यासाठी जीवापाड प्रयत्न केलेत. मला दिलेला शब्द भाजप पाळून खासदार केले. एका काकांना सोडले आता दुसऱ्या काकांसोबत भाजपचे निष्ठेने काम करेन.  मला जरी एक दोन महिने काम करावयास मिळाले तरी मी असं काम करेन की भाजपचे कमळ रायगड जिल्हात उमळयाशिवाय स्वस्थ बसणार नाही हा माझा शब्द आहे. या उपस्थीत जनसमुदयासमोर मी शब्द देतो आपणास मला दिलेल्या या मोठ्या जबाबदारीची खंत वाटू घेऊ नये. आता राजकीय रणांगण मोकळे झाले आहे पुढे पाहू पण माझी काळजी घेतल्याबद्दल तुमचे आभार अशी कोपरखळी मारत नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील पाटील यांनी शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता राजकीय शरसंधान चिमटे पेणमधील भाजप आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमा प्रसंगी केले

              पेण मध्ये दक्षिण रायगड व पेण विधानसभा मतदार संघातर्फे भाजपने नेते राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळणेकामी महत्वपूर्ण भूमिका घेतली आणि ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडल याची उतराई होण्यासाठी पेणमधे कृतज्ञता सोहळ्यात रविंद्र चव्हाण यांचा गणेशमुर्ती भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी भाजप आमदार डॉ. विनय नातू, आमदार रविशेट पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हा समन्वयक सतिश धारप, कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे गिरीष तुळपुळे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पेण, पनवेल, पाली, सुधागड अलिबाग,  रोहा  या तालुक्यातील तीन हजारापेक्षा जास्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थीत होते..

यावेळी सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी धैर्यशील पाटील हा तळागाळात काम करणारे विश्वासक नेतृत्व आहे.अनेक आंदोलनातील यशस्वी हूकमी चेहरा शांत संयमी पक्षात सर्वाना बरोबरीने घेऊन काम करणारा नेता असल्याने राज्य व केंद्रातील समीतीने त्यांची योग्य निवड आहे हे पटल्यानेच दिग्गजाना डावलून त्यांना खासदारकी दिली. भाजप दिलेला शब्द पाळतो आता सुरेशभाऊ लाड तुम्ही सुध्दा रांगेमधे आहात काळजी नसावी अशा शब्दात कर्जतकरांना धीर देत आपणा सर्वांवर कोकणची मोठी जबाबदारी आहे ती आपण सर्वजण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन शेवटी त्यांनी केले. यावेळी नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील पाटील यांचा कार्यकर्त्याकडून जंगी सतकार करण्यात आला तर संपन्न झालेल्या कार्यक्रमातून भाजपने विधानसभा कॅम्पेनचे रणशिंग ही फुंकले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये