माणगांव तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघड.
लिंगपिसाट आरोपी गोरेगांव पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी – पांडुरंग माने ( गोरेगांव ) देशभरात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अशीच माणुसकीला काळींबा फासणारी आणखी एक घटना गोरेगांव पोलिस ठाणे हद्दीत घडली असून या लिंगपिसाट आरोपीला गोरेगांव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार शिरवली गांवातील आरोपी मारुती सखाराम बाईत यांने माहे मे २०२४ रोजी पिडीत मुलीला खाऊ देतो असे सांगत त्याच्या राहत्या घरात बोलवुन तिच्या अंगावरील कपडे काढून अत्याचार केला होता, पिडीत अल्पवयीन असल्याने तिने याबद्दल घरातील कोणालाही सांगितले नव्हते परंतु तिने याची कल्पना तिच्या समवयीक मैत्रीणीला सांगत तु त्या आजोबांनी बोलावले तर जाऊ नकोस असे सांगितले होते.
शिरवली गांवातील या पिडीत मुलीच्या पोटात काही दिवसांपुर्वी दुखु लागल्याने तिच्या आईने तिला विचारणा केली असता तीने याच्या मागचे कारण सांगितले नाही पण आईने डॉक्टरांकडे जाण्याचा विषय काढल्याने ती घाबरली व तिने झालेला सर्व प्रकार तिच्या सम वयक मुलीला सांगितला त्या मुलीने सर्व प्रकार तिच्या आईला सांगण्यास सांगितले, या अगोदर देखील याबाबत घरच्यांना सांगण्यास तिने सांगितले होते परंतु तिने घाबरुन सांगितले नव्हते मात्र यावेळेस आपल्या मैत्रीणीने सांगितल्याप्रमाणे घाबरलेल्या पिडीत मुलीने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला त्यामुळे पिडीत मुलीच्या आईने व तिच्या घरच्यांनी गोरेगांव पोलिसांकडे धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगत पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविली.
यावेळी ठाणे अंमलदार एस. एल. पवार यांनी तक्रार दाखल करून वरिष्ठांना कळवित आरोपी मारुती सखाराम बाईत वय वर्ष ५० रा. शिरवली यास ताब्यात घेऊन या लिंगपिसाट आरोपीवर गु. र. क्रं १०५/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३७६. ३७६(२)(¡)(¡), ३७६(अ.ब) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८ दाखल केले आहे. पुढील तपास मा. उपविभागीय पो. अधिकारी सुर्यवंशी साहेब तसेच गोरेगाव पोलीस स्टेशनचे सा. पो. नि. सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई रासकर करत आहेत