Join WhatsApp Group
मनोरंजन

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीस विजयाची नामी संधी – विजय तोडणकर.

प्रतिनिधी - नरेश पाटील ( माणगांव )

माणगाव –  श्रीवर्धन विधान सभा मतदार संघ काँग्रेस पक्षाची विचार मंथन सभा माणगाव शहरात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री.चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. यावेळी १९३ श्रीवर्धन विधानसभा संघामध्ये महाविकास आघाडीस विजयाची नामी संधी असल्याबाबतचे प्रतिपादन रायगड जिल्हा कॉग्रेसचे जेष्ठ नेते विजय तोडणकर यांनी केले.

          सभेचे आयोजन माणगांव तालुका अध्यक्ष श्री. विलास सुर्वे यांनी केले होते. श्रीवर्धन तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावान नेते स्व. प्रभाकर वाडकर यांचे दुःखद निधना निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेमध्ये उपस्थित पदाधिकारी, सदस्य तसेच कार्यकर्ते यानी काँग्रेस पक्ष बळकट करणेकरिता मते प्रकट करुन पक्ष वाढी साठी संवाद साधून आपाआपले अभिप्राय नोंदवले.

              श्री. विजय तोडणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीनंतर ह्या मतदार संघामध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगले वातावरण असल्याचे सांगताना महाविकास आघाडीने सक्षम व जनतेमध्ये कार्यरत उमेदवार दिल्यास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. तटकरेंच्या हुकूमशाहीला व कार्यप्रणालीला मतदार संघातील जनता कंटाळली असल्याचे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

           आयोजक श्री.विलास सुर्वे यांनी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी यासाठी वरिष्ठानी प्रयत्न करावेत असे आपल्या भाषणात सांगितले. सरतेशेवटी चंद्रकांत पाटील साहेब यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यानचा काळात श्रीवर्धन ता. काँग्रेस उपाध्यक्ष तथा कोकण मच्छीमार संघटनेचे चेअरमन इम्तियाज कोकाटे, सरचिटणीस गणपत गमरे व इतरांनी देखील आपली मते मांडली.

           सदर सभेस पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी इम्तियाज कोकाटे, गणपत गमरे, सज्जाद सरखोत, वेटू पवार, खेळू गांबिर, महादेव आडीत, प्रकाश पालव, समिर बोरकर, तस्लिम बुरुड, राजा, अबरार काळोखे, शब्बीर फकीर, सौ. अनिता महाडिक यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये