गोरेगांव मध्ये दिपावली निमित्त…’दिपसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन ; रसिक प्रेमींचा उत्कृष्ट प्रतिसाद

गोरेगांव – गोरेगांव मध्ये दिपावली निमित्त पाडव्याचे औचित्य साधत दि. ०२/११/२०२४ रोजी सायं. ०७.०० वाजता गोरेगांव कलाप्रेमीतर्फे “दिपसंध्या २०२४ “या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध विहारात करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात मा. श्री. प्रकाश अधिकारी (सर), श्री. व सौ. सुरेश पालकर (सर), श्री. वसंत शिगवण, श्री. विकास गायकवाड, श्री. दिनेश हरवंडकर, सौ. स्नेहल मराठे या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी सालाबाद प्रमाणे गोरेगांवची लाडकी नृत्यांगणा कु. स्वरांगी अपूर्वा सतिश पांचाळ हिच्या नृत्याविष्काराने श्री गणेश वंदना देण्यात आली तसेच श्री. संदिप साळवी (सर) यांनी ‘सुरनिरागस हो… या प्रसिद्ध गिताचे बासरी वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पुढे मराठी/हिंदी गाणी गाऊन ‘गोरेगांव कला प्रेमींनी वातावरणातील समा बांधला. गायिका सौ. अपूर्वा पांचाळ यांनी श्री. गणेश आराधना गाउन…माय भवानी, तुझे लेकरु, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, तसेच ‘आली माझ्या घरी ही दिवाळी ‘ हे दिपावली गीत गाउन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देखील केले. कु. सायली गोरेगांवकर हिने – अरे मन मोहना, तेरे बिना जिया जाएना, क्या खुब लगती हो- ही गाणी सादर केली तर गायकांमध्ये श्री. शैलेंद्र साळवी- जेव्हा तुझ्या बटांना, धुंदी कळ्यांना, ही गाणी गायली तर श्री. मंगेश गोरेगांवकर यांनी- पाहिले न मी तुला,मेरे नैना सावन भादों, श्री. सतिश पांचाळ यांनी-किसीकी मुस्कुराहटोंपे हो निसार हे गाणं गायले या सर्व गायकांना श्री. संजय घाडगे यांनी हर्मोनियमची साथ देत- गीत रामायण, शुर आम्ही सरदार, अबीर गुलाल उधळीत रंग अशी उत्कृष्ट अभंग, भावगीते, भक्तीगीते गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत श्रोत्यांची मने जिंकली, सोबतच श्री. संदेश गोरेगांवकर (ऑक्टोपॅड), श्री.राकेश मेस्त्री (तबला) श्री.कु.ओमकार मेस्त्री ( मृदंग ) यांच्याकडून वादनाचे सहकार्य मिळाले. श्री. संदिपम्हाप्रळकर यांनी गाणी गायली नसली तरी ‘दिप संध्या २०२४’ हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साथ दिली त्यामुळे एकूणच सर्वांच्या साथीने ही संध्या लाखमौलाची ठरली. !!!
या कार्यक्रमास गोरेगांवातील नामांकित असलेल्या हिरकणी ग्रुपच्या महिला तसेच गोरेगांव व लोणेरे परीसरातील कला रसिक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. वसंत शिगवण यांनी दिपसंध्या कार्यक्रमाची स्तुती करीत दिपसंध्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे चालु ठेऊन आम्हा श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. यापुढेही हा कार्यक्रम दरवर्षी असाच चालु रहावा यासाठी मनापासुन शुभेच्छा देऊन कौतुक केले, प्रसंगी मा. श्री. प्रकाशजी अधिकारी (सर) यांनी ‘स्वयंलिखीत ‘कृष्णगान’ या पुस्तकाच्या प्रति ग्रुपच्या सर्वच कलाकारांना देऊन त्यांचा मान वाढविला. शेवटी दिपसंध्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाचे सहकार्य लाभलेल्या श्री. दिनेश हवंडकर, वामन बैकर, जगदीश भोकरे, जगदीश भाई दोशी. रोहित शिंदे, मंगेश कदम, अविनाश गोरेगांवकर तसेच बंटी पांचाळ यांचे गोरेगांव कलाप्रेमी ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.