राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचाराला अभुतपुर्व प्रतिसाद..

गोरेगांव – रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते म्हणून सुपरिचित असलेले तथा १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून “लिफाफा” या प्रेमाचा आहेर म्हणून ओळखल्या जाणारे ‘पाकीट चिन्हावर’ निवडणूक लढत असलेले उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या झंजावती प्रचार दौऱ्याला सुरूवात केली आहे…राजाभाऊ ठाकूर यांनी प्रचाराची सुरुवात सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगर येथील श्रीगणेशाचे दर्शन घेऊन केली असून प्रचारा दरम्यान त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील आंबेत ,संदेरी, संदेरी मोहल्ला, लिपणी वावे, पांगळोली, तोराडी, कोल्हे, काळींजे तसेच श्रीवर्धन मधील आरावी आणि चिखलप येथील मतदारांच्या भेटीसाठी जात आपल्या उमेदवारीचा प्रसार – प्रचार करीत आहेत. राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचाराकरीता खेड्या पाड्यातील त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत उपस्थित रहात आहेत.. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा पुर्वी कॉंग्रेस आय पक्षाचा बालेकिल्ला खऱ्या अर्थाने स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांच्याच बालेकिल्ला आहे.
श्रीवर्धन मतदार संघातून राजाभाऊ यांनी जरी अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरला असला तरी ते कॉंग्रेस पक्षाचेच उमेदवार आहेत.. हे या भागातील मतदारांना चांगला ज्ञात आहे. शिवाय स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांचे विचार घेऊन आणि स्वर्गिय मधुकर ठाकूर यांचा आशिर्वाद पाठीशी घेऊन या मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांच्या विकासाचा दुरदृष्टीकोन घेऊन आलेल्या आपल्या लाडक्या उमेदवाराला प्रचंड मतानी विजयी करण्याचा निर्धार या मतदारांनी केल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.
प्रचारासाठी आलेल्या आपल्या लाडक्या उमेदवाराशी संवाद साधण्यासाठी युवा, तरूण – तरुणीं मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसुन येत आहे. स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांच्या बालेकिल्ल्यात मधूकर ठाकुर यांचे चिरंजीव राजेंद्र मधूकर ठाकुर उर्फ राजाभाऊ यांना मतदारांकडून निवडणुकीसाठी पाठींबा देण्यात येत असून…श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील पुढील आमदार आपणच असाल, चिंता करु नका तुम्हाला आमचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही… असे वक्तव्य करीत त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
प्रचारादरम्यान, राजाभाऊ ठाकूर यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस सचिव डॉ. नरेंद्र सिंह, माणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे, संदेरी मोहल्ला येथील काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक फारुख परकार, श्रीवर्धन ता. येथील काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा कोकण मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष इम्तियाज कोकाटे, सचिव गणपत गमरे यांच्या सह दिनेश खैरे, प्रसाद चापे सह मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थक उपस्थित होते….