Join WhatsApp Group
मनोरंजन

रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटी आयोजित खेळ पैठणीच्या खेळात अपूर्वा नेमळेकर यांची उपस्थिती !

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने आयोजित उलवे नोड येथील नवरात्र उत्सवात दिनांक ६ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उलवे नोड मधील या खेळात शंभरहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.  खेळ पैठणीचा खेळात मुख्य आकर्षक होते ते रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर यांची उपस्थिती होती. अपूर्वा नेमळेकर फक्त उपस्थित राहिल्या नाहीत तर त्यांनी गरबा नृत्याचा आस्वाद घेतला व ठेका धरला. त्यांच्या सहभागाने महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला. त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी मोनाली भिलारे, द्वितीय क्रमांक पायल घाडगे, तृतीय क्रमांक संचिता कोळी तर चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी छाया शेट्टी यांना मानाच्या पैठण्या देण्यात आल्या. तर लकी ड्रॉ द्वारे चार भाग्यवान महिलांना सेमी पैठण्या देण्यात आल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या संस्थेमार्फत अतिशय सुरेख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये