Join WhatsApp Group
सामाजिक

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान.

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना योग्य मानसन्मान व्हावा. त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी, महिलांना समाजात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, समाजातील शेवटच्या घटकाला मान सन्मान मिळावा, न्याय मिळावा या अनुषंगाने ही छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नऊ महिलांचा (नवदुर्गांचा )सन्मान करण्यात येतो. याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून रँकर्स अकॅडमी, कोप्रोली चौक, उरण येथे नवदुर्गांचा सत्कार सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला.

प्रीती नायर (सामाजिक क्षेत्र ), डॉ. श्वेता इंगोले (वैद्यकीय क्षेत्र ), सीमा भोईर (पत्रकारिता ), सरोज म्हात्रे (बचत गट ), सुगंधा म्हात्रे (आशा वर्कर ), सुगंधा पाटील (स्वच्छता कर्मचारी ), ऍडवोकेट दीपाली गुरव (न्यायदान क्षेत्र ), सुनीता वर्तक (शिक्षण क्षेत्र ), कनिष्का नाईक (पोलीस प्रशासन ) या नवदुर्गांचा शाल गुलाब पुष्प प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, साडी देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याने उपस्थित महिलांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. सदर उपक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुनील वर्तक, निवेदिका हेमाली म्हात्रे यांनी तर आभार प्रदर्शन सुनिल वर्तक यांनी केले. ज्या महिलांचा सत्कार झाला त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून महिलांच्या विविध समस्या व दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकला. चांगल्या क्रमांकाचे आयोजन केल्याने उपस्थित महिलांनी आयोजकांचे आभारही मानले.

यावेळी व्यासपीठावर आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर आदर्श शिक्षिका सुप्रियाताई मुंबईकर, रँकर्स अकॅडेमीचे अध्यक्ष प्रतीक मुंबईकर,आदर्श शिक्षिका सुनीता वर्तक, महिला सामाजिक कार्यकर्त्यां प्रीती नायर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सुप्रिया ताई मुंबईकर यांनी महिलांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. महिलांच्या विविध समस्यावर प्रकाश टाकत उपस्थित सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, सुप्रियाताई मुंबईकर, प्रतीक मुंबईकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, संपर्कप्रमुख ओमकार म्हात्रे, सचिव प्रेम म्हात्रे, माधव म्हात्रे,अजित म्हात्रे, नितेश पवार, हितेश मोरे, आदित्य पाटील, प्रणित पाटील, सागर घरत, प्रकाश म्हात्रे, सचिन म्हात्रे, शुभम ठाकूर, जयदास म्हात्रे, शरद पाटील, आदींनी विशेष मेहनत घेतली.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये