
गोरेगांव – संत रोहिदास गर्जना मंडळ नसून एक कुंटूंब आहे जो प्रत्येक सण उत्सव साजरे करण्यास प्रसिद्ध आहे. असाच कोजागिरी पोर्णिमेचा सण संत रोहिदास गर्जना कुंटूबाच्या महिलांनी १६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी सुखसंपत्तीच्या वरदानाचे वाटप करत भूतलावर फिरते अशी रम्यतम श्रद्धा जनमानसात दृढ आहे. आपल्या कर्तव्याप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती, राष्ट्राप्रती, निसर्गाप्रती आपण जागृत असणे, महालक्ष्मीला अभिप्रेत असते. जो जागृत असतो, तोच आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ शकतो. असाच आनंद दरवर्षी या कुंटूंबाकडून घेतला जातो.
सर्व चांगल्या गोष्टी एकत्र आल्यावर काय घडते हे सर्वांनाच माहित आहे असेच आपल्याही आयुष्यात सर्वकाही चांगले घडावे, म्हणून कोजागिरीचे व्रत करावे, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती, असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. म्हणून कोजागिरीला चंद्राला दूधाचा नैवेद्य दाखवतात आणि त्याची किरणे दूधात पडल्यावर ते दूध प्रसादरूपी ग्रहण केले जाते.
संत रोहिदास गर्जना मंडळाच्या कुटूंबाकडून विशेषत: महिलावर्गातून या वर्षी कोजागिरी पोर्णिमा साजरी करताना संपुर्ण कुटूंबाला रात्री जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
जेवणानंतर महिला वर्गाकडून गरबा नृत्य तसेच नाचगाण्याचा आनंद रात्री १२: ३० पर्यंत घेतला गेला यानंतर महिला वर्गाने एकत्र येत माता लक्ष्मीची आणि चंद्राची पुजा केली तसेच संपुर्ण संत रोहिदास गर्जना कुंटूबाने एकत्र येत मसाले दुधाचा आनंद घेत कोजागिरी पोर्णिमेचा सण उत्साहात तितक्याच जल्लोषात साजरा केला.
या उत्साहासाठी गोरेगांव नगरीचे माजी. पंचायत समिती सदस्य मंगेश कदम, गोरेगांव शिवसेना विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर यांनी विशेष सहकार्य केले सोबतच रोशन डि. जे यांनी साऊंड सिस्टिम देऊन महिलांचा आनंद द्विगुणित केला.