श्री रविप्रभा मित्र संस्थेची वार्षिक सभा संपन्न ; सभेत घेण्यात आले महत्वाचे निर्णय
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर. ( म्हसळा )

म्हसळा – दि. १२ ऑक्टो रोजी नेवरुळ येथे श्री रविप्रभा मित्र संस्थेची सभा संपन्न झाली, या वेळी सभा सुरू होण्याच्या अगोदर संस्थेच्या प्रोसिडींग वही, हिशोब वही यांचे अध्यक्ष यांच्या हस्ते पुजन करून व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन सभेला सुरुवात करण्यात आली या वार्षिक सभेमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
१) शैक्षणिक साहित्य वाटप ज्या शाळेला करायचे आहे त्या शाळेचे मागणी पत्र व पालक आणि विद्यार्थी यांची १००% उपस्थिती असणे अवश्यक.
२ ) ज्या विद्यार्थ्याला १० वी नंतर स्पर्धा परिक्षा किंवा महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे आहे पण आर्थिक चणचण असेल त्या विद्यार्थ्याला संस्था पुस्तके उपलब्ध करून देणार.
३ ) संस्थेच्या वतीने देण्यात येणारा गुण गौरव पुरस्कार २०२५ या वेळी जिल्हा स्तरावर देण्यात येणार.
४ ) संस्थेच्या महिला सदस्य यांना सक्षमिकरण या साठी महिलांना लघु उद्योग सुरु करून देण्यासाठी संस्थेचे एक पाऊल पुढे.
५ ) तसेच सर्वात महत्वाचा ठराव म्हणजे संस्थेचे सर्व सदस्य यांच्या साठी अत्यावश्यक ( मेडिकल ) खर्चासाठी संस्था दहा हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत करणार
संस्थेच्या या महत्वाच्या निर्णयाचे सर्व ठिकाणी स्वागत होताना दिसत आहे. या पुढे संस्थेच्या सर्व सभासदांची जबाबदारी वाढली असून संस्थेच्या माध्यमातुन अनेक महत्वाचे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे, त्या मध्ये आरोग्य शिबीर, नेत्ररोग निदान शिबीर, लहान मुलांचे आरोग्य शिबिर, मुलींना स्वसंरक्षण प्रात्यक्षिक त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लाड यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले. सचिव संतोष उध्दरकर यांनी संस्थेचे मागील कामकाज व चालु कामकाजाचे वाचन केले तर जमा खर्चाचे वाचन संस्थेचे खजिनदार सुशांत लाड यांनी केले सोबतच संस्थेचे नविन सभासद होऊ इच्छितात त्यांनी संस्थेचे सचिव यांच्या कडे संपर्क करण्याचे आवाहन देखील संख्येच्या वतीने करण्यात आले. संस्थेच्या उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष नरेश विचारे यांनी मानुन सभा संपन्न झाली असे जाहिर करण्यात आले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड, उपाध्यक्ष नरेश विचारे, सचिव संतोष उध्दरकर,सह सचिव स्वप्नील लाड,खजिनदार सुशांत लाड, सदस्य समीर लांजेकर, शंकर कासार, सुजित काते,संतोष घडशी, किशोर घुलघुले व महिला सभासद कल्पाणी लाड, स्वराली लाड, क्षमिका लाड, रंजना काते, आदी सर्व सदस्य उपस्थित होते.